४ ते ५ मध्यम नान
वेळ: फर्मेंटेशनसाठी - साधारण १ ते दिड तास । नान बनवण्यासाठी १० ते १५ मिनीटे
२ कप मैदा
१ टिस्पून ड्राय यिस्ट
१/४ कप दही (महत्त्वाची टीप १)
१/४ कप कोमट पाणी
१/२ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ (साधारण १/२ ते १ टिस्पून)
२ ते ३ टेस्पून तेल
१) कोमट पाण्यात थोडी साखर मिक्स करून घ्यावी. त्यात ड्राय यिस्ट घालून व्यवस्थित ढवळावे. झाकण ठेवून १० मिनीटे उबदार ठिकाणी ठेवावे. १०-१५ मिनीटात यिस्ट घातलेले पाणी फेसाळेल.
२) मैदा एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊन त्यात मिठ घालावे. यिस्टचे पाणी घालून मिक्स करावे. १/४ कप दही घालून मळावे. जर लागले तर पिठ मळायला अजून कोमट पाणी वापरावे. पिठ एकदम सैल मळून घ्यावे. हाताला तेल लावून निट मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचा व्यवस्थित गोळा करावा आणि वरून थोडा तेलाचा मुलामा करावा. वरती झाकण ठेवून उबदार ठिकाणी साधारण १ तासभर ठेवावे म्हणजे पिठ चांगले फुलून येईल.
३) तासाभरानंतर फुललेले पिठ परत एकदा मळून घ्यावे. ओव्हन ब्रॉइलवर गरम करावे. बेकिंग ट्रेला थोडे तेल लावावे. हाताला थोडे तेल लावून पिठाचे ४ ते ५ समान गोळे करावे. कोरडे पिठ घेऊन नान लाटावे. आणि बेकिंग ट्रेवर ठेवावे. एका बेकिंग ट्रेवर साधारण २ नान राहतील.
४) ट्रे वरच्या रॅकवर ठेवावा. एका बाजूला दिड मिनीट ठेवावे आणि लागल्यास अर्धा मिनीट अजून ठेवावे. ब्राऊन स्पॉट्स आल्यावर ट्रे बाहेर काढावा. नान दुसर्या बाजूला पलटावे आणि साधारण १ मिनीटभर बेक करावे.
बटर अँड सेसमे नान
गरमागरम नानवर बटर चोळून त्यावर भाजलेले तिळ पेरावेत आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आणि लगेच सर्व्ह करावे.
गार्लिक नान
नान बेक करायच्या आधीच २ टेस्पून बटर आणि ३ ते ४ लसणीच्या पाकळ्यांची पेस्ट एकत्र करावी. नान ओव्हनच्या बाहेर काढल्यावर लगेच चमचाभर गार्लिक बटर नानवर लावावे. आणि गरमागरम सर्व्ह करावे.
पंजाबी पद्धतीच्या भाज्या तसेच इतर रेसिपीज साठी इथे क्लिक करा.
टीप:
१) फ्रिजमधील गार दही वापरू नये यामुळे मळलेले पिठ तासाभरात फुलून येत नाही. तेव्हा पिठ मळताना थोडे गरम पाणी वापरावे.
No comments:
Post a Comment