मेदू वडा बनवण्याच्या 3 पद्धती
Back to Medu Vada Recipe In English and In Marathi
पद्धत १ - भोकाचे वडे - याला थोडा सराव लागतो.
हात पाण्यात बुडवून मोठ्या लिंबाएवढा गोळा चार बोटांवर घ्यावा, अंगठ्याने मध्यभागी होल तयार करावे. आणि लगेच तेलात सोडावा. वडा बोटांवरून सरकण्यासाठी अंगठ्याने तळापासून अलगद पुढे ढकलावा. याला थोडा सराव लागतो.
पद्धत २ (स्टेप बाय स्टेप इमेजेस) - भोकाचे वडे - प्लास्टिकच्या मदतीने
जाड प्लास्टीकचा एक तुकडा घ्यावा. त्याला थोडा पाण्याचा हात लावून त्यावर साधारण २ चमचे मिश्रण ठेवून त्याला मध्यभागी भोक पाडावे. प्लास्टीकचा तुकडा एका हातात घ्यावा, दुसरा हात पाण्यात बुडवून घ्यावा आणि अलगदपणे प्लास्टिकवरचा थापलेला वडा ओल्या हातात चार बोटांवर घ्यावा आणि लगेच तेलात सोडावा.
Click here to see how to prepare vada step by step
पद्धत ३ (Quick and Easy method)
जर मेदूवड्याचा शेप द्यायला जमत नसेल तर एकेक टेस्पून मिश्रणाचे गोळे तेलात तळून छोटी छोटी बोंडं करू शकतो. यामुळे चवीत फार फरक पडणार नाही. फक्त मोठे गोळे न तळता छोटे बोंडं तळावी म्हणजे आतपर्यंत निट शिजतील.
Tuesday, April 14, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment