साहित्य:
१ कप Sour Cream
१/२ कप साखर
चिमूटभर केशर
१ टेस्पून दूध
३ टेस्पून दही
१/२ टिस्पून वेलचीपूड
बदाम पिस्त्याचे काप
कृती:
१) दूध कोमट करून घ्यावे. त्यात केशर घालून मिक्स करावे. केशराचा रंग दूधात उतरू द्यावे. Sour Cream मध्ये साखर घालून साखर ढवळावे. दही फेटून Sour cream मध्ये घालावे. फ्लेवर येण्यासाठी वेलचीपूड आणि रंगासाठी केशर घातलेले दूध घालून ढवळावे.
२) निट मिक्स करून डब्यात भरून दोन ते तीन तास फ्रिजमध्ये ठेवावे. जेवणात वाढताना फिजमधून काढावे.
पुर्यांच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा
टीप:
१) Sour Cream उष्णतेमुळे लगेच पातळ होते. त्यामुळे श्रिखंड फ्रिजमध्येच ठेवावे.
घरगुती चक्क्यापासून श्रिखंड
दह्यापासून चक्का
Labels:
Instant Shrikhand, Shrikhand Puri
No comments:
Post a Comment