वाढणी: २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
२०० ग्राम कॉलीफ्लॉवरचे तुरे
२ टेस्पून तेल
३ हिरव्या मिरच्या
१/२ टिस्पून हळ्द
१ टेस्पून आलेलसूण पेस्ट
३/४ कप कांदा, बारीक चिरून (१ मध्यम)
१ कप टोमॅटो, बारीक चिरून (२ मध्यम)
३/४ कप दही
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ
१ टेस्पून कसूरी मेथी
कोथिंबीर सजावटीसाठी
तेल, कॉलीफ्लॉवरचे तुरे तळण्यासाठी
कृती:
१) कॉलीफ्लॉवरचे तुरे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. पाणी पाघळून घ्यावे आणि पेपर टॉवेलने अधिकचे पाणी टिपून घ्यावे. तळणीसाठी तेल तापत ठेवावे. त्यात मध्यम आचेवर कॉलीफ्लॉवरचे तुरे गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यावे.
२) एका पॅनमध्ये २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात हळद आणि आलेलसूण पेस्ट घालून ३० सेकंद परतावे. नंतर हिरव्या मिरच्या आणि चिरलेला कांदा घालून कांदा शिजेस्तोवर परतावे.
३) कांदा निट परतला गेला कि त्यात चिरलेले टोमॅटो घालून, टोमॅटो मऊ होईस्तोवर शिजवावेत. नंतर धणे-जिरेपूड घालून मिक्स करावे. लगेच तळलेले कॉलीफ्लॉवरचे तुरे घालून हलक्या हाताने मिक्स करावे. गॅस मंद आचेवर ठेवावा आणि दही घालून मिक्स करावे. चवीपुरते मिठ घालावे आणि गरजेनुसार थोडे पाणी घालून ढवळावे. मंद आचेवर ३ ते ४ मिनीटे शिजू द्यावे.
४) कसूरी मेथी चुरून पावडर करून घ्यावी आणि भाजीत घालावी. मिक्स करून मंद आचेवर पॅनवर झाकण ठेवून काही मिनीटे वाफ काढावी.
कोथिंबीरीने सजवून पोळी, रोटी किंवा नानबरोबर सर्व्ह करावे.
Labels:
Gobi Masla, how to make Gobi Masala, Cauliflower curry
No comments:
Post a Comment