Tuesday, July 28, 2009

सांबार मसाला - Sambar Masala

सांबार मसाला

वेळ: १५ मिनीटे
साधारण १/४ ते १/२ कप मसाला

साहित्य:
१/२ टिस्पून मेथी दाणे
१ टिस्पून उडीद डाळ
१ टिस्पून चणाडाळ
६ ते ७ सुक्या मिरच्या
२ टिस्पून धणे
१/२ कप ताजा खोवलेला नारळ
१५-२० पाने कढीपत्ता पाने

कृती:
१) मेथी दाणे, उडीद डाळ, चणा डाळ, धणे (टीप) मंद आचेवर गुलाबीसर भाजावी. किंचीत रंग बदलला कि सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि नारळ घालून २ मिनीटे परतावे. गार झाले कि मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.

टीप:
१) धणेपूड वापरली तरीही चालेल, फक्त किंची परतून घ्यावी

सांबार पाककृती

No comments:

Post a Comment