Tuesday, April 20, 2010

खजूर चटणी - Dates Chutney

Dates Chutney in English

साधारण १ कप चटणी
वेळ: १० मिनीटे

Date Chutney sweet and sour chutney, tamarind chutney, sweet chutney
साहित्य:
१५० ग्राम खजूर (pitted baking dates) (टीप १)
लिंबाएवढा चिंचेचा गोळा (बिया काढून)
१/४ कप किसलेला गूळ (ऐच्छिक) (टीप २)
१ हिरवी मिरची किंवा १/४ चमचा लाल तिखट
४ ते ५ पुदीना पाने
१ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून जिरेपूड
२ चिमटी काळे मिठ
चिमूटभर साधं मिठ

कृती:
१) चिंच, १/२ कप गरम पाण्यात भिजवून ठेवावी. किंवा १/२ कप पाणी उकळावे. पाणी उकळले कि गॅस बंद करावा. त्यात चिंच भिजवून ठेवावी आणि वरून झाकण ठेवून १/२ तास तसेच ठेवावे.
२) चिंचेचे पाणी कोमट झाले कि मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. बारीक गाळण्याने व्यवस्थित गाळून घ्यावे आणि चोथा वेगळा करावा.
३) मी बिया काढलेले आणि अगोदरच मॅश केलेले खजूर वापरले होते. यामध्ये काही चमचे पाणी घालून हातानेच मॅश करावे.
४) मिक्सरमध्ये हिरवी मिरची, पुदीना, मॅश केलेला खजूर, चिंचेचा कोळ, गूळ, धणे-जिरेपूड, काळं मिठ, आणि साधं मिठ घालावे. सर्व एकत्र मिक्सरवर बारीक करावे.
हि चटणी चाट पदार्थांबरोबर, समोसा किंवा भज्यांबरोबर खुप चविष्ट लागतो. - चाट पदार्थांच्या रेसिपीजसाठी इथे क्लिक करा.

टीप:
१) जर तुम्ही साधे खजूर वापरणार असाल तर साधारण १३ ते १५ खजूर वापरावे. आधी त्यातील बिया काढून टाका. नंतर अगदी थोड्या कोमट पाण्यात साधारण दिड-दोन तास भिजवून ठेवावेत. पाणी बाजूला काढावे आणि खजूर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. वाटताना बाजूला काढलेल्या पाण्यातील थोडेसेच पाणी वापरावे.
२) कधीकधी खजूराचा गोडपणा चटणीला तेवढा गोडपणा देत नाही. या चटणीत गोडपणा वाढवण्यासाठी मी यात गूळ वापरला आहे. त्यामुळे गूळ घालण्याच्या आधी चव पाहावी आणि गरज वाटल्यासच गूळ घालावा. तसेच गूळाऐवजी साखरही वापरू शकतो.

Labels:
Tamarind Chutney, Sweet and sour chutney, dates chutney, Khajoor Chutney, Mithi chutney.

No comments:

Post a Comment