Sunday, August 26, 2007

भरली मिरची - Bharali Mirchi

Bharali Mirachi

१) लांबट हिरव्या मिरच्या

bharali mirachi, mirachichi bhaji, masala mirachi, stuffed mirachi, stuffed capsicum २) तयार भरली मिरची



साहित्य:
२ लांबट हिरव्या मिरच्या (या मिरच्या कमी तिखट असतात, आणि त्यांची साल जाडसर असते. पण चवीला खुप छान लागतात.)
३ ते ३ १/२ टेस्पून चणा पिठ
१ टेस्पून खवलेला नारळ
१/२ टेस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचूर पावडर
१/४ टिस्पून हळद
२ टिस्पून लाल तिखट
चिमूटभर हिंग
चवीपुरते मीठ
१/२ टिस्पून साखर
तेल

कृती:
१) खवलेला नारळ सोडून सर्व मसाला एकत्र करावा. फ्राईंग पॅनमध्ये १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात आधी नारळ आणि नंतर बाकीचा मसाला घालावा. १-२ मिनीटे परतावे. मसाला बाजूला काढून ठेवावा.
२) मिरच्या धुवून पुसून घ्याव्यात. त्यांना उभी चिर द्यावी जेणेकरून त्यात मसाला भरता येईल.
३) मसाला मिरच्यांमध्ये भरावा. मसाला बाहेर पडू नये म्हणून दोर्याने मिरच्या बांधून घ्याव्या.
४) मध्यम आचेवर फ्राईंग पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करावे. त्यात किंचित लाल तिखट घालावे. ज्यामुळे मिरच्यांच्या बाहेरील बाजूंना फ्लेवर येतो. नंतर भरलेल्या मिरच्या पॅनमध्ये ठेवाव्यात. वरून झाकण लावून वाफ काढावी. २-४ मिनीटांनी मिरचीची बाजू पलटावी.
५) खाताना दोरा काढुन टाकावा.

टीप : आपल्या आवडीनुसार मसाल्यात थोडा गरम मसाला किंवा करी मसाला घालू शकतो.

Labels:
Stuffed Pepper, Stuffed Bell Pepper, North Indian Recipe, Indian Stuffed Mirchi recipe

No comments:

Post a Comment