Friday, November 16, 2007

छोले - Chhole

Chole in English

Chole, kabuli chana, white chickpeas recip, chole recipe, Chhole recipeसाहित्य:
१ कप पांढरे काबुली चणे (White Chickpeas)
१ कप बारीक चिरलेला कांदा
अडीच कप बारीक चिरलेला टोमॅटो
दिड टिस्पून छोले मसाला
फोडणीसाठी: १/२ टिस्पून जिरे,१/४ टिस्पून हळद, २ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून आले पेस्ट
३ लसूण पाकळ्यांची पेस्ट
१ टिस्पून आमचूर पावडर
१ टिस्पून धणेपूड
२-३ टिस्पून तेल
कोथिंबीर
लिंबू
मीठ

कृती :
१) चणे ९-१० तास भिजत घालावे. नंतर कूकरमध्ये ४ शिट्या करून चणे शिजवून घ्यावे, शिजवताना पाण्यात थोडे मिठ घालावे. चणे मऊसर शिजवावे. अगदी जास्त शिट्ट्या केल्या तर चणे फुटतात. त्यामुळे प्रत्येकाने घरातील कूकरचा अंदाज घेउन चणे शिजवावेत.
२) कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरावेत.
३) चणे शिजले कि कढईत २-३ टिस्पून तेल गरम करावे. जिरे, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी, आले-लसूण पेस्ट घालून परतावे, कांदा परतावा. कांदा परतला कि त्यात टोमॅटो घालावा. थोडी धणेपूड घालावी. मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे.
४) टोमॅटो अगदी नरम झाला कि शिजलेले चणे घालावेत, चवीपुरते मीठ घालावे म्हणजे चणे शिजताना मीठ आत मुरते. आवश्यक तेवढे पाणी घालावे. मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी.
५) २-३ मिनीटांनी छोले मसाला आणि आमचूर पावडर घालून ढवळावे. जर मीठ किंवा तिखट कमी वाटत असेल तर वरून घालावे. थोडावेळ मंद आचेवर उकळू द्यावे.
खासकरून छोले आणि भटुरे यांचे काँबिनेशन मस्तच लागते. तसेच छोले पाव किंवा पोळीबरोबरही खायला छान लागतात.

Labels:
Chole Recipe,Punjabi Chole Recipe, Punjabi Recipe, Chole Bhature Recipe, North Indian Food, Chole, Chhole, Punjabi Chole Reicpe, Spicy Chole Recipe, Chhole bhature, cholle bhature recipe

No comments:

Post a Comment