Wednesday, November 7, 2007

काकडीचा केक - Kakadicha Cake

Kakadicha Cake

हा काकडीचा केक बराचसा तवसळी नावाच्या कोकणी पदार्थासारखा आहे. सणासुदीला गोडधोड म्हणून काकडीचा केक नक्की करून पाहा.

cucumber cake, kakadi cake, kakadi recipe

साहित्य:
२ वाट्या काकडीचा किस
१ वाटी रवा
१ वाटी गूळ
४ टेस्पून बटर
१ चमचा तूप
१ लहान चमचा वेलची पूड
बदामाचे काप

कृती:
१) काकडी सोलून किसून घ्यावी. दोन्ही हाताने दाबून त्यातले पाणी काढून टाकावे.
२) रवा तूपावर भाजून घ्यावा. मध्यम आचेवर कढईत बटर घालावे. त्यात रवा, गूळ आणि काकडीचा किस घालून ढवळत राहावे. ५-१० मिनीटांत रवा, गूळ, काकडीचा किस यांचे मिश्रण मिळून येते. त्यात वेलची पूड घालून ढवळावे.
३) ओव्हन ३७५ F ला प्रिहिट करावे. बेकिंग ट्रे मध्ये तूपाचा हात लावावा. त्यात तयार मिश्रणाचा १ इंचाचा थर करावा. त्यावर बदामाचे काप घालावे. १५-१८ मिनीटे बेक करावे. केकच्या कडा थोड्या गोल्डन ब्राऊन झाल्या कि केक तयार झाला असे समजावे.
४) केक ट्रेमधून काढावा सुरीने चौकोनी वड्या कराव्यात.

टीप:
१) हा केक गरम खायला जास्त छान लागतो. त्यामुळे जर थोडा उरलाच तर खाताना मायक्रोवेवमध्ये गरम करून खावा.
२) केक बेक केल्यावर थोडे नारळाचे दूध घालावे छान टेस्ट येते.

Labels:
Eggless Cake, Cucumber Cake, Homemade Cake, Cake recipe, Cucumber Semolina Cake, Semolina Cake

No comments:

Post a Comment