Veg Fried Rice In English
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
लागणारा वेळ: भाज्या चिरण्यास २० मिनीटे + भात तयार करायला २० मिनीटे
साहित्य:
१ कप तांदूळ (बासमती)
४ कप वेजिटेबल स्टॉक
१ कप बारीक चिरलेली कोबी
पाउण कप पातळ कापलेली भोपळी मिरची
पाउण कप बारीक चिरलेला पाती कांदा + गार्निशिंगसाठी
अर्धा कप अगदी पातळ चिरलेले गाजर
१/४ कप बारीक चिरलेली फरसबी
दिड टिस्पून लसूण पेस्ट
१ टिस्पून आले पेस्ट
२ बारीक चिरलेल्या मिरच्या
२ टेस्पून सोयासॉस
१ टेस्पून व्हिनेगर
२ टिस्पून तेल
मीठ
कृती:
१) प्रथम वेजिटेबल स्टॉक बनवून घ्यावा.
२) ३ कप वेजिटेबल स्टॉकमध्ये १ कप तांदूळ घालून भात बाहेर शिजवून घ्यावा. शिजवताना थोडे मिठ घाला.(क्युबपासून बनवलेल्या स्टॉकमध्ये मीठ असते त्यामुळे चव बघुनच मीठ घालावे). भात पूर्ण न शिजवता किंचीत कच्चा ठेवावा. नंतर चाळणीत अलगदपणे निथळून ठेवावा. पाचएक मिनीटांनी एखाद्या ताटात किंवा परातीत मोकळा करून ठेवावा. हलक्या हाताने थोडे तेल लावावे. (टीप १)
३) कढईत २ चमचे तेल गरम करावे. गॅस हायवर ठेवावा. त्यात मिरची, आले-लसूण पेस्ट घालून फ्राय करावे. मिश्रण भातात घालावे.
४) तेल न घालता प्रत्येक चिरलेली भाजी (except पातीकांदा)अर्धा-अर्धा मिनीट गॅस मोठा ठेवूनच फ्राय करून घ्यावी. यातील भोपळी मिरची परतताना १ टेस्पून सोयासॉस आणि किंचीत मिठ घालावे. १/२ टेस्पून सोयासॉस घालून कोबी परतावी आणि १/२ टेस्पून सोयासॉस घालून गाजर परतावे. यामुळे भाज्यांना सोयासॉसचा फ्लेवर येतो आणि भातामध्ये सोयासॉस व्यवस्थित सर्वठिकाणी लागतो. इतर सर्व भाज्या नुसत्याच परताव्या. सर्वात शेवटी १०-१५ सेकंद पाती कांदा फ्राय करावा. सर्व भाज्या आणि भात एकत्र करावे.
कढईत हाय गॅसवर भात (भाज्या आणि आलेलसूण पेस्ट सहित), व्हिनेगर आणि लागल्यास मिठ घालावे. भात छानपैकी फ्राय करावा. भाताची चव बघून वाटल्यास भात परतताना १/२ टिस्पून सोयासॉस घालावा.
टीप:
१) जर फ्राईड राईस संध्याकाळी बनवायचा असेल तर शक्यतो भात सकाळीच वरीलप्रमाणे बनवून ठेवावा. भात शिजवून हवेवरती गार झाल्यावर ताटामध्येच ठेवावा व त्यावर अजून एक ताट ठेवून फ्रिजमध्ये ३-४ तास गार करावा. यामुळे भाताची शिते मोकळी राहतात आणि भात छान फडफडीत बनतो.
२) बर्याचवेळा सोयासॉसमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्याने भाताची चव खारट होवू शकते. म्हणून शेवटी मिठ घालताना आधी भाताची चव पाहावी, गरज वाटल्यासच मिठ घालावे.
वेज मंचुरीयन बरोबर हा भात मस्त लागतो.
Labels:
Vegetable Fried Rice, Indo chinese food, spicy fried rice, chinese food, chinese recipe, vegetable fried rice recipe, veg fried rice recipe
Thursday, November 29, 2007
वेजिटेबल फ्राईड राईस - Vegetable Fried Rice
Labels:
Bhatache Prakar,
Cabbage,
Indo-Chinese,
Main Dish,
U - Z
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment