Monday, March 10, 2008

पट्टी सामोसा - Patti Samosa

Patti Samosa (English Version)

फोटो १
फोटो २

फोटो ३
Patti samosa recipe, samosa recipe, samose, how to make samosa, indian samosa recipe, samosas

साहित्य:
२ वाट्या मैदा
१ वाटी बेसन
मोहन घालायला ४ चमचे तेल
१ ते दिड वाटी मटार
२ बटाटे
३-४ मीरच्या
पाउण वाटी ओले खोबरे
फोडणीचे साहित्य: ३-४ चमचे तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद
१ चमचा गरम मसाला
१ चमचा लिंबू रस
मीठ
तळण्यासाठी तेल



कृती:
१) सर्वप्रथम मैदा व बेसन एकत्र करावे. ४-५ चमचे तेल कडकडीत गरम करावे आणि पिठाला मोहन घालावे. चवीपुरते मीठ घालावे. पाणी घालून पिठ घट्टसर मळावे व झाकून ठेवावे.
२) बटाटे सोलून त्याच्या बारीक चौकोनी फोडी कराव्यात. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये ३-४ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी त्यात मटार आणि बटाटे घालून परतावे. मध्यम आचेवर वाफ काढावी. मधेमधे ढवळावे. बटाटे व मटार शिजले कि त्यात ओले खोबरे, गरम मसाला, मीठ, लिंबू रस घालून ढवळावे.
३) भिजवलेल्या पिठाच्या फुलक्याच्या आकाराच्या पातळसर पोळ्या लाटाव्यात. प्रत्येक पोळी फक्त ४-४ सेकंद भाजावी. (फोटो २) अशा प्रकारे पोळ्या भाजून घेतल्याने समोश्यावर फुगवटे कमी येतात.
४) १/२ वाटी कणिक किंवा मैदा घेउन त्याची घट्टसर पेस्ट बनवावी. भाजलेल्या प्रत्येक पोळीचे सुरीने दोन अर्धगोलाकार भाग करावेत. अर्धगोलाच्या दोन बाजू पेस्टने जोडून कोन बनावावा [फोटो ४ (२) व फोटो ३]. त्यात १-२ चमचे भाजी भरून आधी १ बाजू आत मुडपावी दुसर्या बाजूला पेस्ट लावून ती बाजू दुमडून चिकटवावी [फोटो ४ (३)]. त्रिकोणी समोसे मध्यम आचेवर तळून काढावे.
हे सामोसे चिंचगूळाच्या चटणीबरोबर छान लागतात.

टीप:
१) आवडीनुसार तिखटपणा कमीजास्त करावा.

Labels
Samosa Recipe, Indian Samosa, Fried Snacks, Potato and green peas recipe

No comments:

Post a Comment