Tuesday, May 6, 2008

भोपळ्याच्या पुर्‍या - Bhoplyachya Purya

Bhopalyachya Purya (English Version)

भोपळ्याच्या पुर्‍या २-३ प्रकारे करता येतात. त्यातील एक पद्धत मी पुढे देत आहे.

healthy recipe, Chinese, Mexican Food, Thai recipes, Low calorie diet, Diet recipe, Low cholesterol recipe, reduce fat
साहित्य:
२ कप भोपळ्याच्या बारीक फोडी (साले काढून)
१ कप किसलेला गूळ
कणिक
१ चमचा तेल
तळण्यासाठी तेल

कृती:
१) भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये शिजवून घ्याव्यात. कूकरमध्ये पाणी घालावे. कूकरच्या डब्यात फोडी घालाव्यात, डब्यात पाणी घालू नये. डब्याला वरती एक ताटली ठेवावी ज्यामुळे पाणी आत जाणार नाही व फोडी वाफेवर शिजतील.
२) कूकरची वाफ मुरली कि फोडी असलेला डबा बाहेर काढावा. फोडी गरम असतानाच त्यात गूळ घालावा व घोटावे. यासाठी गॅस लावण्याची गरज नाही भोपळ्याच्या फोडी व्यवस्थित शिजल्या असतील तर मिश्रण छान एकजीव होते.
३) मिश्रण पातळ झाले कि त्यात भिजेल इतपत कणिक घालावी व पोळ्यांसाठी भिजवतो इतपत घट्ट असावी. १-२ चमचे तेल घालून मळावे. मिश्रण थोडावेळ झाकून ठेवावे.
४) तळण्यासाठी तेल गरम करावे. पुर्‍या लाटाव्यात व गुलाबीसर रंगावर तळून काढाव्यात.

Labels:
Bhopla Puri, Pumpkin Puri, Pumpkin Sweet Puri, Pumpkin recipe, Bhopala recipe, Gharge

No comments:

Post a Comment