Pavbhaji Bites (English Version)
साहित्य:
८ फ्रेंच ब्रेडचे तुकडे (Image) (१ इंचाचे)
(हा ब्रेड वरून कडक आणि आतमध्ये नरम असतो.)
१ कप पावभाजीची भाजी
किसलेले चिज
चिरलेली कोथिंबीर
१) फ्रेंच ब्रेडचे तुकडे एका डब्यात भरून ठेवावेत. डब्याचे झाकण थोडे उघडे ठेवावे जेणेकरून ब्रेड थोडा कडक होईल.
२) ब्रेडच्या तुकड्यावर एक ते दिड चमचा पावभाजी पसरावी. त्यावर थोडे किसलेले चीज घालावे.
३) ३५० F वर ओव्हन प्रिहीट करावे. हे ब्रेडचे तुकडे १०-१२ मिनीटे किंवा चिज वितळेपर्यंत बेक करावे. सर्व्ह करताना थोडी कोथिंबीर पेरावी.
हे पावभाजी बाईट्स चहाच्या वेळी स्नॅक म्हणून खायला छान लागतात.
Labels:
pavbhaji bites, Spicy Snacks, pavbhaji recipe, bhaji pav recipe, leftover recipe, party snacks, pavbhaji snacks, mumbai pavbhaji
Tuesday, May 27, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment