वाढणी : ३-४ जणांसाठी
![cucumber salad, indian salad, indian raita, kakadichi koshimbir, koshimbir, kachumbar, khamang kakdi, Low calorie salad recipe](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjdxvQEBwNuownEBdVXjwrYS-zfCOysWcdvZtBnKDrf5HHt2yQpfnSwSXhyphenhyphenfO3nZED4uXQRJdjFWRXHxOmW1AyDIJXMV7oi4g-7jchFP2eJpql4YiF2sbI6BAD1RzzEQ8V2ah9I_6CV3AAs/s320/khamang+kakdi.jpg)
साहित्य:
२ कप चोचवलेली काकडी (कृती - क्र. १)
३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ टिस्पून लिंबाचा रस
१/२ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
३ ते ४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ
कृती:
१) काकडीची शेवटची दोन टोके कापावीत, आधी काकडी कडू नाहीये ना! हे चव घेवून पाहावे. नंतर काकडी सोलून चोचवून घ्यावी. चोचवलेल्या काकडीला थोडे मिठ चोळून एका वाडग्यात ठेवावे. मिठामुळे काकडीला पाणी सुटेल. हे पाणी काढून टाकावे तसेच चोचवलेली काकडी दोन्ही हाताने पिळून त्यातील अधिकचे पाणी काढून टाकावे. अशी पाणी काढून पिळलेली टाकलेली काकडी आपल्याला २ कप लागेल.
२) ही काकडी वाडग्यात घेऊन त्यात शेंगदाण्याचा कूट, चिरलेली कोथिंबीर, साखर घालून मिक्स करावे.
३) कढल्यात तूप गरम करून त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्यांतील थोडी मिरची घालून फोडणी करावी व काकडीत घालावी.
४) उरलेली मिरची एका वाटीत घ्यावी. त्यात अगदी किंचीत मिठ घालावे (कारण आधीच काकडीला मिठ लावले आहे). चमच्याने किंवा हाताने चुरडावी आणि काकडीला लावावी. लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
हि चविष्ट अशी खमंग काकडी उपवासाला किंवा इतर दिवशीही कोशिंबीर म्हणून जेवणात समाविष्ट करू शकतो.
Labels:
Cucumber Salad, kakadi Koshimbir recipe, Cucumbar Raita, Indian cucumber Raita
No comments:
Post a Comment