Gajar Halwa - Carrot Pudding (English version)
साहित्य:
३ कप गाजर किस
१ कप दूध
१/२ कप साखर
२ टेस्पून साजूक तूप
१/२ टिस्पून वेलचीपूड
बदामाचे काप
कृती:
१) बदाम ३-४ तास पाण्यात भिजवून त्याची साले काढावीत. आणि त्याचे पातळ काप काढावेत. गाजर सोलून किसून घ्यावीत. पातेल्यात २ चमचे तूप गरम करावे. ३ कप गाजराचा किस त्यात घालून २-३ मिनीटे परतावे.
२) २-३ मिनीटांनंतर दूध घालावे. ढवळून मध्यम आचेवर पातेल्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे. साधारण १० मिनीटे शिजू द्यावे.
३) दुध बर्यापैकी आटले कि त्यात साखर घालावी व ढवळावे. गॅस मोठा ठेवावा आणि आटू द्यावे. वेलचीपूड घालावी. व्यवस्थित आटले कि गॅस बंद करावा.
गाजर हलवा गरम तसेच गारसुद्धा छान लागतो. वेनिला आईसक्रिम आणि गाजर हलवा यांचे कॉम्बिनेशनसुद्धा मस्त लागते.
टीप:
१) जर घरात बदाम उपलब्ध नसतील तर ७-८ शेंगदाणे भिजवून त्याची साले काढून काप करावेत.
Labels:
gajar Halwa, Gajar Halva, Gajaracha Halwa, Carrot Pudding, Corrot Halwa, Carrot Sweet dish, Indian Dessert
Thursday, July 3, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment