Boondi Raita in English
वाढणी: ३-४ जणांसाठी
साहित्य:
१ कप बुंदी (साधी)
३/४ कप पातळ ताक
३/४ कप दही
१/४ कप दूध
चवीपुरते मिठ
१/४ टिस्पून मिरपूड
::इतर जिन्नस::
१/२ टिस्पून जिरेपूड
१/४ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून चाट मसाला
२ टेस्पून बुंदी (न भिजवलेली)
थोडीशी कोथिंबीर
कृती:
१) सर्वप्रथम बुंदी ताकामध्ये साधारण २० मिनीटे भिजवून ठेवावी. २० मिनीटांनंतर बुंदी चेपून त्यातील ताक काढून टाकावे. खुप जास्त जोरात पिळू नये नाहीतर बुंदी मोडू शकते. ताक पुढील वापरासाठी ठेवून द्यावे.
२) ३/४ कप दही फेटून घ्यावे त्यात दूध, चवीपुरते मिठ आणि मिरपूड घालून निट ढवळून घ्यावे. मिठ थोडे कमीच घालावे कारण विकतच्या बुंदीमध्ये अगोदरच थोडे मिठ असते. दह्यात बुंदी घालून मिक्स करावे. जर मिश्रण खुप घट्ट वाटले तर किंचीत उरलेले घालून मिक्स करावे.
३) चव पाहून रायते सर्व्हींग प्लेटमध्ये घालावे. वरून जिरेपूड व किंचीत लाल तिखट भुरभूरवावे. मध्यभागी थोडी बुंदी घालावी. रायते खाताना मधेमधे थोडी कुरकूरीत बुंदी छान लागते. कुरकूरीत बुंदीवर अजून थोडे लाल तिखट, चाट मसाला व कोथिंबीर भुरभूरवावी. अर्धा एक तास फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवावे.
जेवताना थंड असे बुंदी रायते सर्व्ह करावे.
टीप:
१) जर आवडत असेल तर रायते आणि seasonings एकत्र मिक्स करू शकतो, पण रायत्याचा रंग लालसर होतो, चवीत फार फरक पडत नाही.
२) रायते थंड आवडत नसेल तर रेफ्रिजरेट न करताही सर्व्ह करू शकतो, छानच लागते.
Labels:
Boondi Raita, Dahi Boondi, Bundi raita, yogurt and fried gram flour snack
Friday, November 21, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment