Thursday, November 13, 2008

दही बटाटा पुरी - Dahi Batata Puri

Dahi Batata Puri in English

पाणीपुरी हा माझा फार आवडीचा पदार्थ आहे, घरी पुर्‍या केल्या कि मुद्दाम जास्त करून ठेवायच्या मग काही वेगळे चाटचे पदार्थही बनवता येतात. दहीपुरी हा त्याच कॅटेगरीतील पदार्थ.बनवायलाही सोपा!! नक्की करून पाहा..

वाढणी: २ प्लेट

dahi puri, sev batata puri, chat food, mumbai chat, tangy chat food
साहित्य:
१४ पाणीपुरीच्या पुर्‍या
१/२ कप शिजवून किसलेला बटाटा
१/२ कप चिरलेला कांदा
१/२ कप चिरलेला टोमॅटो
३/४ कप घट्ट दही
१/२ कप चिंचगूळाची चटणी
१/४ कप हिरवी चटणी
आवडीनुसार चाट मसाला
काळे मिठ
मिठ
१/२ टिस्पून साखर
सजावटीसाठी कोथिंबीर

कृती:
१) पुरीच्या पातळ बाजूला भोक पाडून दोन प्लेटमध्ये प्रत्येकी ७ पुर्‍या ठेवाव्यात.
२) दही घोटून घ्यावे. त्यात ३ ते ४ चमचे पाणी घालून किंचीत सैलसर बनवावे. त्यात थोडे मिठ आणि साखर घालून ढवळावे.
३) पुर्‍यांमध्ये थोडा बटाटा भरावा, थोडे मिठ पेरून नंतर कांदा आणि टोमॅटो भरावा. वरून चिमूटभर काळे मिठ भुरभुरावे. चिंचगूळाची चटणी आणी हिरवी चटणी घालून चाटमसाला भुरभुरावा. प्रत्येक पुरीवर दही घालावे आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

टीप:
१) आवडीनुसार सजावटीसाठी नायलॉन शेवही घालू शकतो.
Labels:
Dahi Puri, Chat food, Mumbai street food, Sev puri

No comments:

Post a Comment