Thursday, November 6, 2008

ड्राय गोभी मंचुरियन - Dry Gobhi Manchurian

Gobhi Manchurian in English

वाढणी: २ जणांसाठी

gobhi manchurian, Dry manchurian, Chinese restaurant, authentic chinese food, Cauliflower manchurianसाहित्य:
दिड कप कॉलिफ्लॉवर (छोटे फ्लोरेट्स)
१/२ टिस्पून मिठ
२ चिमूट हळद
::::तळताना आवरणासाठी::::
१/४ ते १/२ कप कॉर्न स्टार्च
१ टेस्पून मैदा (ऐच्छिक)
१/२ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून मिरपूड
मिठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल
:::सॉससाठी:::
१ टेस्पून तेल,
१ टेस्पून आलेपेस्ट, १ टेस्पून लसूणपेस्ट
२ टेस्पून सोयासॉस
१/२ टिस्पून साखर
१/२ कप कांदा, एकदम बारीक चिरून
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/२ टिस्पून चिली फ्लेक्स
१ टेस्पून विनेगर
१ टिस्पून कॉर्न स्टार्च
साधारण १/२ कप किंवा गरजेनुसार पाणी
चवीनुसार मिठ
गार्निशिंगसाठी: २ टेस्पून पातीकांदा बारीक चिरून, १/४ कप कोबी पातळ चिरून (ऑप्शनल)

कृती:

१) आधी सॉस बनवून घ्यावा. त्यासाठी मोठ्या आचेवर नॉनस्टिक पॅन गरम करावा, तेल गरम करावे. आलेलसूण पेस्ट परतून घ्यावी. मिरच्या घालाव्यात. नंतर साखर आणि सोयासॉस घालून काही सेकंद परतावे.
२) लगेच कांदा घालावा. कांदा निट शिजू द्यावा. कांदा निट परतला गेला कि १ टिस्पून कॉर्न स्टार्च, १/४ कप पाण्यात मिक्स करून हे मिश्रण परतलेल्या कांद्यात घालावे. चिली फ्लेक्स, विनेगर आणि मिठ घालावे. गरजेनुसार पाणी वाढवून साधारण १-२ मिनीटे कॉर्न स्टार्च शिजू द्यावा. हा सॉस दाटसरच असतो त्यामुळे बेताचेच पाणी वाढवावे.
Gobhi Manchurian, Cabbage Manchurian, Indo Chinese, Appetizer, authentic chinese३) आता कॉलिफ्लॉवरचे मंचुरीयन नगेट्स बनवावेत. एका मध्यम पातेल्यात पाणी गरम करावे त्यात थोडे मिठ आणि किंचीत हळद घालून उकळू द्यावे. उकळत्या पाण्यात कॉलिफ्लॉवरचे छोटे फ्लोरेट्स घालावेत आणि अगदी अर्धवट शिजवून घ्यावेत (साधारण ३ मिनीटे). शिजवताना झाकण ठेवू नये.
४) हे उकळवलेले फ्लोरेट्स पेपर टॉवेलवर थोडावेळ काढून ठेवावेत. तोवर तळणाची तयारी करावी. कॉर्न स्टार्च व मैदा एकत्र करून त्यात पाणी घालून मध्यम दाटसर पिठ भिजवून घ्यावे. लाल तिखट, मिरपूड आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे.
५) तेल तापत ठेवावे. तेल तापले कि आच मध्यम करावी. कॉलिफ्लॉवरचे फ्लोरेट्स भिजवलेल्या पिठात बुडवून लाईट ब्राऊन रंगावर तळून घ्यावेत.
६) या तळलेल्या फ्लोरेट्सवर थोडे लाल तिखट भुरभुरावे. तयार केलेला सॉस गरम करून त्यात पातीकांदा व कोबी घालून मिक्स करावे. त्यात तळलेले फ्लोरेट्स घोळवून गरमागरम सर्व्ह करावेत.

Labels:
Gobhi Manchurian, Dry Gobhi Manchurian, Cauliflower Manchurian

No comments:

Post a Comment