Veg Paneer Makhanwala in English
वाढणी: ३ जणांसाठी
खाली दिलेली कृती ज्यांना खुप मसालेदार पंजाबी भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी स्पेशल आहे. चवीला खुप छान आणि सौम्य लागते.
साहित्य:
१/२ कप पनीरचे तुकडे
१/४ कप फरसबीचे तुकडे (१/२ इंच)
१/४ कप गाजर (छोटे चौकोनी तुकडे)
१/४ कप बटाटा (सोलून छोटे तुकडे)
१/४ कप फ्लॉवरचे तुकडे
१/२ कप कांदा (छोटे तुकडे)
३ टेस्पून मटार
१ कप टोमॅटोचे तुकडे (सोललेला)
१ टेस्पून टोमॅटो पेस्ट
१/२ टेस्पून जिरे
१/२ टेस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून गरम मसाला
१ तमालपत्र
दिड टेस्पून दुध
दिड टेस्पून बटर
२ टेस्पून तूप
चवीपुरते मिठ
कृती:
१) २ कप पाण्यात फरसबीचे तुकडे, गाजर, बटाटा, फ्लॉवरचे तुकडे आणि मटार उकळवत ठेवावे. या पाण्यात १ तमालपत्र घालावे. भाज्या निट शिजू द्याव्यात. भाज्या शिजल्या कि उरलेले पाणी ठेवून द्यावे. तमालपत्र काढून टाकावे.
२) २ टोमॅटो पाण्यात साल सुटेस्तोवर उकळवावे. साले काढून टोमॅटोचे बारीक तुकडे करावे.
३) नॉनस्टीक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरे घालावे व कांदा परतावा. कांदा परतला कि १/२ टिस्पून गरम मसाला घालावा. कांदा निट शिजू द्यावा.
४) नंतर टोमॅटोचे तुकडे घालावे. तूपाचा तवंग येईस्तोवर शिजू द्यावे.
५) नंतर उकळलेल्या भाज्या घालाव्यात, भाज्या उकळून उरलेले पाणी, टोमॅटोपेस्ट घालावी, मिठ आणि तिखट घालावे. ढवळावे.
६) गॅस मंद करून दुध, बटर, पनीर घालून हळूवार ढवळावे.४ ते ५ मिनीटे मंद आचेवरच झाकून शिजू द्यावे.
गरमा-गरम भाजी नान, रोटी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.
Labels:
Paneer Makhanwala, Vegetable Makhanwala, Punjabi Recipes
Tuesday, January 20, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment