Crispy Bhendi in English
वाढणी: १ प्लेट (२ जणांसाठी)
साहित्य:
१५ भेंडी, मध्यम आकाराच्या
२ टेस्पून बेसन
१ टेस्पून तांदूळ पिठ
१/२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
१ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
१/४ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल (टीप १)
चवीनुसार चाट मसाला
कृती:
१) भेंडी धुवून घ्यावी. व्यवस्थित पुसून देठं कापून घ्यावीत. प्रत्येक भेंडीचे एकदम पातळ उभे काप काढावेत.
२) एका छोट्या वाटीत बेसन, तांदूळ पिठ, लाल तिखट, हळद, जिरेपूड, थोडा चाट मसाला आणि चवीपुरते मिठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करावे. भेंडीचे पातळ काप एका वाडग्यात घ्यावेत व त्यात आलेलसूण पेस्ट घालून चमच्याने ढवळावे. त्यात बेसन पिठाचे मिश्रण घालून हलक्या हाताने मिक्स करावे. हे मिश्रण १५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कढईत तेल गरम करावे. भेंडीचे मॅरीनेटेड पातळ काप तेलात सुटे करून सोडावेत. मिडीयम हाय गॅसवर कुरकूरीत होईस्तोवर तळावेत. शक्यतो ३ ते ४ बॅचमध्ये भेंडी तळावी. तळलेले भेंडी काप पेपर टॉवेलवर काढून घ्यावेत. यावर थोडे लिंबू पिळावे किंवा चाटमसाला घालावा. तिखटपणासाठी लाल तिखट भुरभूरवावे.
हि क्रिस्पी भेंडी स्टार्टर म्हणून छान लागते.
टीप:
१) भेंडीसाठीचे कोटींग सुके असल्याने तळताना ते तेलात उतरते त्यामूळे तेल कमीच घ्यावे आणि ३ ते ४ बॅचमध्ये भेंडी तळावी.
२) क्रिस्पी भेंडी बनवताना पाणी वापरू नये. अगदीच गरज पडल्यास चमचाभर पाणी घालावे. जास्त पाणी घातल्यास बाहेरचे आवरण कुरकूरीत होणार नाही.
Labels:
Crispy Bhindi, Kurkuri Bhendi, Fried Okra
Tuesday, March 17, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment