Thursday, March 5, 2009

पाइनॅपल फ्राईड राईस - Pineapple Fried Rice

Pineapple Fried Rice in English

वाढणी: २ ते ३ जणांसाठी

indian chinese recipe, fried rice recipe, pineapple fried rice recipe, indo chinese food, asian food, chinese food, veg fried riceसाहित्य:
३/४ कप बासमती तांदूळ
१/२ टिस्पून + १ टेस्पून तेल
१ टेस्पून किसलेले आले
१-२ हिरव्या मिरच्या
३ पाती कांदा बारीक चिरून (चिरलेल्यातील थोडा पातीकांदा गार्निशींगसाठी ठेवावा)
१/२ कप अननसाचे बारीक तुकडे
१ टिस्पून सोयासॉस
१/२ वेजिटेबल स्टॉकची क्युब (ऑप्शनल) वेजिटेबल स्टॉक बनवण्यासाठी

हा भात चायनिज स्टर फ्राईड वेजिटेबल्स बरोबर छान लागतो.

कृती:

१) बासमती तांदूळ धुवून घ्यावा. एका पातेल्यात तांदूळाच्या दुप्पट ते सव्वा दोनपट पाणी गरम करत ठेवावे. त्यात उपलब्ध असल्यास वेजिटेबल स्टॉकची १/२ क्युब घालावी. ती विरघळली कि तांदूळ घालावे. थोडे मिठ आणि १/२ टिस्पून तेल घालावे. भात मोकळा शिजवावा.
२) शिजवलेला भात एका ताटात काढून थंड होवू द्यावा. आणि भाताच्या ताटावर दुसरे ताट ठेवून हा भात थोडा वेळ (२० मिनीटे) फ्रिजमध्ये ठेवावा. म्हणजे भाताला चिकटपणा येणार नाही आणि अजून मोकळा होईल.
३) नंतर कढईत १ टेस्पून तेल गरम करून त्यात १/२ टेस्पून किसलेले आले घालावे, उभ्या चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. पाती कांदा घालून अगदी १० सेकंद परतावे. सोयासॉस घालून लगेच भात घालावा. १-२ मिनीटे परतावे. गरजेनुसार मिठ घालावे.
४) गॅस मंद करून त्यात अननसाचे तुकडे घालून मिनीटभर परतावे. उरलेले आले घालून मिक्स करावे.
हा भात गरम गरम सर्व्ह करावा. सर्व्ह करताना गार्निशींगसाठी वरून थोडा चिरलेला पाती कांदा घालावा.

Labels:
Pineapple fried Rice, Fried Rice recipe

No comments:

Post a Comment