Tuesday, August 25, 2009

तळलेले मोदक - Fried Modak

Fried Modak in Marathi

वेळ: ४० मिनीटे
साधारण १० लहान आकाराचे मोदक

talalele modak, moduk recipe, Ganeshji prasad, sweets, Ganpati prasad fried modakसाहित्य:
१/२ कप खिरापत
१/२ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
तळण्यासाठी तेल/ तूप
१ टीस्पून दूध
ओल्या नारळाचे सारण भरायचे असेल तर ओल्या नारळाच्या करंज्यांचे सारण वापरावे.

कृती:

१) मैदा आणि रव एकत्र करून घ्यावा. २ चमचे तेल कडकडीत गरम करून मोहन घालावे. किंचीत मिठ घालून हाताने मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. साधारण अर्धा तास झाकून ठेवावे.
२) अर्ध्या तासाने पिठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे साधारण दिड इंचाचे समान गोळे करून घ्यावे. तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पुरी लाटून घ्यावी. पुरी एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हानाने मुखर्‍या पाडाव्यात. मध्यभागी जो खळगा झाला असेल त्यात १ चमचा सारण भरावे. सर्व मुखर्‍या एकत्र करून कळी बनवावी आणि १ थेंब दुधाचं बोट घेवून कळी निट बंद करावी. सर्व मोदक मंद आचेवर तळून घ्यावे.

टीप:
१) पिठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली कळी बर्‍याचदा तेलात उघडली जाते आणि सारण बाहेर येते, नाहीतर तेल आत जाऊन मोदक तेलकट होतो. म्हणून थोडे दुध लावल्यास कळी पक्की बंद होते. फक्त अगदी कणच दुध वापरावे.
२) मोदक मंद आचेवरच तळावे. मोठ्या आचेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून तळलेले वाटतात पण आतून कच्चे राहतात आणि लगेच मऊ पडतात.

Labels: Fried modak, talalelel modak, Ganpati Prasad

No comments:

Post a Comment