वेळ: ५ मिनीटे
२ जणांसाठी
१ कप जाड पोहे
१/४ ते १/२ कप दुध
१ टिस्पून मिरचीचे लोणचे
३/४ कप दही
चवी्पुरते मिठ
कृती:
१) दुध गरम करून पोह्यांवर घालावे. मिक्स करून ५ मिनीटे ठेवून द्यावे. गरम दुधामुळे पोहे लगेच मऊ होतात.
२) एका वाटीत मिरचीचे लोणचे आणि १ चमचा दही असे निट मिक्स करून घ्यावे. लोणच्यातील मिरची जरा चुरडून घ्यावी.
३) दुध आणि पोहे गार झाले कि त्यात दही आणि मिरची लोणचे कालवलेले दही असे छान मिक्स करावे. गरजेपुरते मिठ घालावे. वाटल्यास बरोबर थोडे दही आणि अजून मिरचीचे लोणचे घ्यावे आणि सर्व्ह करावे.
टीप:
१) वरील पोहे तयार झाले कि त्यात १ टिस्पून तूप जिर्याची फोडणी घातल्यास चव छान लागते.
२) जर मिरचीचे लोणचे वापरायचे नसेल तर १-२ हिरव्या मिरच्या, मिठ, आणि जिरे असे वाटून घ्यावे. वरील प्रमाणेच पोहे बनवावे आणि त्यात मिरचीचे वाटण आवडीनुसार घालावे. तसेच थोडी चिरलेली कोथिंबीरही घालावे.
Labels:
Dahikala, Dahipohe, Dahi Pohe, Gopalkala
No comments:
Post a Comment