१२ मध्यम आकाराचे वडे
वेळ: ३० मिनीटे
१ कप थालिपीठाची भाजणी रेसिपीसाठी इथे क्लिक करा
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/२ ते १ टिस्पून लाल तिखट
चिमूटभर हिंग
१/४ टिस्पून हळद
१ टेस्पून तेल मोहनासाठी
तळण्यासाठी तेल
चवीपुरते मिठ
कृती:
१) थालिपीठाच्या भाजणीमध्ये २ टिस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालावे. त्यात कोथिंबीर, लाल तिखट, मिठ, हिंग आणि हळद घालून मिक्स करावे.
२) कोमट पाणी घालून मळून घ्यावे. १५ मिनीटे झाकून ठेवावे. तळणीसाठी तेल गरम करावे. मळलेल्या भाजणीचे साधारण १०-१२ छोटे गोळे करावे
३) प्लास्टिकचा कागदाला थोडा पाण्याचा हात लावून त्यावर हातानेच वडा थापावा आणि मधे भोक पाडून गरम तेलात तळून काढावा.
टीप:
१) जर भाजणी खमंग भाजलेली नसेल तर वडे थोडे मऊ पडतात. तसेच भोक न पाडता वडे बनवले तर ते पुरीसारखे फुगतात आणि नंतर मऊ पडतात.
२) पिठ भिजवताना पिठामध्ये १ टिस्पून तिळ, १/४ टिस्पून ओवा आणि १/२ टिस्पून जिरे घातल्यास चव छान लागते.
३) वडे जर तेलात तुटत असतील तर भिजवलेल्या भाजणीत १ ते २ चमचे गव्हाची कणिक घालावी तसेच तिखट मिठही किंचीत वाढवावे.
No comments:
Post a Comment