चकल्या नरम पडण्याची कारणे
भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर - सर्व जिन्नस व्यवस्थित खमंग भाजावे.
मोहन कमी झाले तर - उकडीवर थोड्या तेलाचे मोहन घालावे आणि मळून चकल्या कराव्यात.
चकल्या मोठ्या आचेवर किंवा अगदी लहान आचेवर तळल्यास - चकल्या मध्यम आचेवर तळाव्यात.
चकलीच्या भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास - भाजणीची उकड मळताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याने मळावी.
चकलीचे पिठ गरजेपेक्षा नरम भिजवल्यास - अशावेळी थोडी कोरडी भाजणी घालावी. मळून परत चकली करावी.
चकली तेलातून लगेच काढल्यास - चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबूडे येतात नंतर बुडबूडे बंद होवून चकली थोडी खाली बसायला लागेल अशावेळी चकली झाली असे समजावे. त्याआधी चकली तेलातून काढू नये.
चकल्या तेलात घातल्यावर विरघळण्याची कारणे
पिठात मोहन जास्त झाले तर - थोडी भाजणीची उकड काढावी (तेल न घालता), आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिक्स करावे आणि त्याच्या चकल्या करून पाहाव्यात.
चकल्या तुटण्याची कारणे
चकल्या पाडताना तुटत असतील म्हणजे पिठ गरजेपेक्षा जास्त घट्ट मळले गेले आहे - गरम पाण्याचा हात घेऊन भाजणीची उकड किंचीत मऊ मळावी.
चकली रेसिपीसाठी इथे क्लिक करा.
Monday, November 1, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment