नग: १५ मध्यम चौकोन
वेळ: ३० मिनीटे
१ कप बारीक चिरलेली कोबी
२ कप बारीक चिरलेली पालकाची पाने
१ कप बेसन
१ टिस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
१ टिस्पून लसूण पेस्ट
१/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
चिमूटभर हळद
चिमूटभर हिंग
चवीपुरते मिठ
कृती:
१) प्रथम कोबी, पालक, मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिंग, हळद, आणि मिठ एकत्र मिक्स करून घ्यावे.
२) त्यावर २ ते ३ चमचे पाणी शिंपडावे. नंतर बेसन घालून मिक्स करावे. चिकटसर मिश्रण तयार करावे.
३) ढोकळा करायचा साचा असेल तर त्याला तेलाचा किंचीत हात लावावा. त्यात १ ते दिड सेमीचा समान थर पसरवावा. खुप जाड थर करू नये.
४) १५ मिनीटे वाफवून घ्यावे. २ इंच आकाराचे चौकोन पाडावे किंवा आवडेल त्या शेपमध्ये कापावे.
गरमा गरम कोबी पालक वडी चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावी. या वड्या तेलविरहीत अल्पोपहार (Oil free Snack) म्हणून उत्तम उपाय आहेत.(चिकटू नये म्हणून लावलेले तेल सोडले तर)
तरीही, या वड्या डीप फ्राय केल्या किंवा शालो फ्राय केल्या तर अजून चविष्ट आणि खमंग लागतात.
टीपा:
१) जर तुमच्या कडे ढोकळा पात्र नसेल तर प्रेशर कूकरही वापरू शकता. मोठा प्रेशरकूकर घेऊन त्यात तळाला पाणी घालावे. वरण-भातासाठी जो डबा वापरतो त्या डब्याला आतून तेलाचा हात लावावा. पातळसर थर करून कूकरमध्ये ठेवावा. शिट्टी काढून १५ मिनीटे वाफवावे. यामध्ये २ ते ३ विभागात वड्या वाफवाव्या लागतील.
२) जर वड्यांच्या आकाराविषयी Concern नसाला तर इडली पात्रातही मिश्रण थापून वाफवू शकतो.
No comments:
Post a Comment