Cauliflower Kheema in English
वाढणी: ४ जणांसाठी
वेळ: ३० मिनीटे
साहित्य:
दिड कप कॉलीफ्लॉवरचा चुरा (कॉलीफ्लॉवरचे तुरे मिक्सरमध्ये बारीक करावे)
१/२ कप हिरवे मटार (मी फ्रोजन वापरले होते)
१/२ कप कांदा, बारीक चिरून
३ मध्यम टोमॅटो, ब्लांच करून प्युरी करावी
१ टिस्पून गरम मसाला
१ ते ३ टिस्पून पावभाजी मसाला
१ टिस्पून आलेलसूण पेस्ट
१ टिस्पून धणेपूड
२ टेस्पून तेल
फोडणीसाठी: १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद, १/४ टिस्पून लाल तिखट
चवीपुरते मिठ
कृती:
१) २ टेस्पून तेलामधील, १ टेस्पून तेल कढईत गरम करावे. कॉलीफ्लॉवरचा चुरा त्यात ५ मिनीटे परतावा. नंतर दुसर्या भांड्यात काढून ठेवावा.
२) त्याच कढईत उरलेले १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात जिरे, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. आलेलसूण पेस्ट घालून थोडावेळ परतावे.
३) त्यात कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यावा. नंतर मटार आणि मिठ घालावे. झाकण ठेवून दोन-तीन मिनीटे मध्यम आचेवर शिजू द्यावे.
४) आता परतलेला कॉलीफ्लॉवरचा चुरा घालून निट मिक्स करावे. यात टोमॅटो प्युरी, धणेपूड, पावभाजी मसाला, गरम मसाला, आणि गरज वाटल्यास थोडे मिठ घालून मिक्स करावे
५) मध्यम आचेवर, कढईवर झाकण ठेवून साधारण ५ मिनीटे शिजू द्यावे.
कॉलीफ्लॉवर खिमा पोळी बरोबर छान लागतो.
Labels:
Cauliflower sabzi, flower chi bhaji, cauliflower kheema
Tuesday, November 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment