Navalkol Bhaji in English
वेळ: २५ मिनीटे
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:
२ मध्यम आकाराचे नवलकोल
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहरी, २ चिमटी जिरे, १/४ टिस्पून हळद, २ ते ३ कढीपत्ता
२ हिरवी मिरची
२ टेस्पून ताजा नारळ
१/२ टिस्पून साखर किंवा चवीनुसार
चवीपुरते मिठ
कृती:
१) नवलकोल सोलून मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करावेत.
२) पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हळद, कढीपत्ता व मिरची घालून फोडणी करावी.
३) नवलकोल फोडणीस टाकावा आणि थोडे मिठ घालावे. झाकण ठेवून नवलकोल शिजू द्यावा. मधेमधे थोडे पाणी शिंपडावे म्हणजे नवलकोल शिजायला मदत होईल व करपणार नाही. किंवा पाण्याचे ताट पॅनवर ठेवून नवलकोल शिजवावा.
४) नारळ आणि साखर घालून दोनेक मिनीटे परतावे. कोथिंबीरीने सजवून पोळीबरोबर सर्व्ह करावी.
टीप:
१) पाणी थोडे थोडे शिंपडावे, एकदम खुप पाणी ओतू नये. चव बिघडते.
Tuesday, March 22, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment