Showing posts with label Icecream. Show all posts
Showing posts with label Icecream. Show all posts

Tuesday, May 17, 2011

मँगो आइसक्रीम - Mango Ice cream

Mango Icecream in English

A delicious Homemade Mango Ice-cream.

वेळ: ३० ते ३५ मिनीटे
८ जणांसाठी

Mango Icecream, how to make Icecream at home, eggless icecream, creamy ice creamसाहित्य:
१ कप हेवी व्हिपींग क्रिम, थंडगार
२ कप आंब्याचा रस, थंडगार (मी रेडीमेड कॅन मधील साखर असलेला आंबा रस वापरला होता)
१/२ कप पिठी साखर
वेलचीपूड (ऐच्छिक)

homemade delicious mango icecream, whipping cream, mango pulp, heavy whipping creamकृती:
१) एक मध्यम आकाराचे खोलगट काचेचे बोल घ्या आणि १/२ तास फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवा.
२) गार झालेले काचेचे बोल घेऊन त्यात गार व्हिपींग क्रिम घाला आणि हॅण्ड मिक्सरने जास्त स्पिडवर फेटा.
३) क्रिम थोडे फ्लफी व्हायला लागले कि २ ते ३ बॅचमध्ये साखर घालून फेटत राहा. क्रिम व्यवस्थित फ्लफी झाले कि फेटणे थांबवावे. गरजेपेक्षा जास्त फेटल्याने क्रिम पिवळसर होवून त्यातील स्निग्धांश (fat content) विलग होतो.
४) यामध्ये आता थंड आंब्याचा रस घालून लाकडी कालथ्याने फोल्ड करा. वेलचीपूड घालणार असल्यास आता घाला. किंवा त्याऐवजी तुम्हाला मँगो एसेन्स घालायचा असल्यास २ -३ थेंब घाला. निट मिक्स करा.
५) जर तुमच्याकडे आइसक्रिम मशिन असेल तर त्यात हे मिश्रण घालून घोटवा.
६) जर आईसक्रिम मशिन नसेल तर हे मिश्रण फ्रिझर सेफ प्लास्टिक किंवा फ्रिझर सेफ मेटलच्या भांड्यात घाला (बेकिंगसाठी जे मेटलचे भांडे वापरतात तेही चालेल). साधारण २ तास हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रिजरमधून काढा. आईसक्रिम भांड्याच्या कडेने सुटेस्तोवर थांबा. नंतर हे गोठलेले मिश्रण मिक्सरमध्ये काही मिनीटे ब्लेंड करा. परत भांड्यात ओतून १-२ तास फ्रिजमध्ये ठेवा. २ तासांनी परत मिक्सरमध्ये फिरवा. असे किमान ३ ते ४ वेळा करा म्हणजे आईसक्रिम स्मूथ लागेल.

टीपा:
१) रेडीमेड आमरसाऐवजी घरी बनवलेला हापूस आंब्याचा रसही वापरता येईल. फक्त आमरस चाळणीतून गाळून घ्यावा म्हणजे गुठळ्या किंवा आंब्यातील धागे निघून जातील. तसेच घरगुती आमरस वापरल्यास जास्त साखरही घालावी लागेल तेव्हा चव पाहून साखर घालावी.
२) भाजलेला खवाही आईसक्रिममध्ये वापरू शकतो. वरील प्रमाणासाठी १/२ ते १ कप खवा वापरावा.
३) बारीक चिरलेले बदाम पिस्ताही घालू शकतो.
४) ३-४ वेळा मिक्सरमध्ये मिश्रण ब्लेंड केल्याव शेवटी जेव्हा आईसक्रिम सेट करण्यास ठेवाल त्यावेळी आंब्याचे साल काढून बारीक तुकडे मिश्रणात घालू शकता, छान लागतात.

Tuesday, July 29, 2008

बदाम कुल्फी - Badam Kulfi

Badam Mava Kulfi (English Version)

वाढणी: २-३ जणांसाठी

Kulfi recipe, Icecream recipe, Badam Kulfi, Restaurant style Kulfi recipe, frozen dessert with less fuss, easy dessert recipe, indian grocery, try almond topped indian dessert
साहित्य:
३ कप दुध (होल मिल्क)
१/४ कप ताजा मावा (साधारण ४ टेस्पून)
१/२ ते पाउण कप साखर
१/३ कप बदामाचे काप
२ टिस्पून कॉर्न फ्लोअर
१/२ टिस्पून वेलची पूड
चिमूटभर केशर

indian food recipe, indian dessert recipe, kulfi, almond kulfi, malpova, mango icecream, jalebi recipe, kheer
कृती:
१) बदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून आटवावे. आटवतानाच ३-४ मिनीटांनी साखर घालावी.
२) साधारण अर्धे होईल इतपत आटवावे. आटवताना सारखे ढवळत राहावे ज्यामुळे दूध भांड्याच्या तळाला लागणार नाही.
३) मावा हाताने मोकळा करून घ्यावा. त्यातील गुठळ्या हाताने मोडाव्यात.
४) दोन टेस्पून गार दूधात कॉर्न फ्लोअर मिक्स करावे, हे दूध आटवलेल्या दूधात घालावे व ढवळावे. हळूहळू दुध घट्टसर होईल.
५) दुध घट्टसर झाले कि वेलची पूड, केशर, मावा दुधात घालावा. थोडे गरम करावे. सर्व निट मिक्स करावे. मिश्रण थोडे कोमट झाले कि कुल्फीपात्रात किंवा हिंडालियमच्या पात्रात मिश्रण ओतून फ्रिजरमध्ये सेट करण्यास ठेवावे.
६) कुल्फी घट्ट झाली सर्व्ह करावे.

Labels:
kulfi recipe, matka kulfi, badam Malai Kulfi, Mava Kulfi, Indian Icecream