Showing posts with label Recipe Tools. Show all posts
Showing posts with label Recipe Tools. Show all posts

Monday, June 16, 2008

थाई पाककला आणि सर्च इंजिन

Thai Recipe Search Engine (English Version)


थाई जेवण हा माझा आवडीचा प्रकार. त्यात वापरलेले मसाले, त्यातून तयार होणारे रंग आणि झणझणीत चव यामुळे थाई, आपल्या जवळच्या (म्हणजे भारतीय) चवीचे जेवण वाटते.माझे थाई पदार्थ शिकण्याचे प्रयत्न चालू असतात. तेव्हा मी शोधलेल्या वेबसाईट्सचे सर्च इंजिन बनवावे असे डोक्यात आले. साधारण ५० थाई साईट्स/ ब्लॉगचे हे सर्च इंजिन साहित्याप्रमाणे (Ingredients) रिझल्ट्स देते.


थाई पदार्थ हे नॉनवेजकरीता जास्त फेमस आहेत तरीही थाई पदार्थांमध्ये खुप विवीधता आहे. छान सूप्स आहेत, गोड पदार्थ आहेत. पपई, आंबा, केळी, नारळ वापरून बनवलेल्या भाज्या, गोड पदार्थ आणि वेगवेगळे फ्राईड राईस आहेत, अशी बरीच विवीधता आहे.

तुम्हाला थाई पदार्थांविषयी जाणून घ्यायचे असेल तर हि सर्च इंजिनची लिंक
थाई रेसिपी सर्च इंजिन

काही खास थाई शाकाहारी रेसिपीज

टोफू कोकोनट करी
ग्रिल्ड वेजिटेबल्स
थाई मुळा आणि काकडीचे सलाड
थाई मँगो अँड स्टिकी राईस

Saturday, February 9, 2008

Indian Recipe Search Engine

English Version

मी नेहमी पाककृतींवर लिहिते. आजचे पोस्ट पाककृती शोधण्याविषयी आहे. आपण जी माहिती शोधत असतो ती चटकन आणि नेमकी उपलब्ध होण्याची सोय या इंडियन रेसिपी सर्च इंजिनमुळे होईल अशी आशा आहे.

इंडियन सर्च इंजिन ५०० पेक्षा जास्त इंडियन रेसिपीच्या साईट्स शोधते. त्यात ब्लॉग्स आहेत, प्रोफेशनल साईट्स आहेत, शेफ्सच्या साईट्स आहेत. पण यातून मी Paid रेसिपी साईट्स अंतरभूत केल्या नाहियेत. फ्रि रेसिपी सर्च इंजिन आहे.

आता समजा तुम्ही कॅप्सिकम (Capsicum) असे गूगलमध्ये सर्च केले तर देशी-विदेशी साईट्स, कॅप्सिकम एक्स्पोर्टरसच्या साईट्स आणि बरीच इतर माहिती मिळेल. पण जेव्हा तुम्ही भोपळी मिरची वापरून इंडियन रेसिपी सर्च करत असाल तेव्हा हे सर्च इंजिन तुम्हाला नेमक्या इंडियन रेसिपीज देईल, इतर कुठलीही माहिती न देता.

आता जास्त लिहीत नाही. तुम्हाला जी रेसिपी शोधायची आहे ती खालील सर्च बॉक्समध्ये टाईप करा. तुम्हाला समजा कॉंम्बिनेशन करायचे असेल, म्हणजे मश्रुम आणि पालक असेल घरात आणि त्याची रेसिपी शोधायची असेल तर mushroom + spinach किंवा mushroom + palak असे टाईप करून बघा



Google Custom Search

Try Searching This
"Chicken 65"
bhindi
Hakka Noodles
Dosa
Payasam
Pohe
chicken
kabab
chicken + spinach
dessert
healthy cake

चकली