Thai Recipe Search Engine (English Version)
थाई जेवण हा माझा आवडीचा प्रकार. त्यात वापरलेले मसाले, त्यातून तयार होणारे रंग आणि झणझणीत चव यामुळे थाई, आपल्या जवळच्या (म्हणजे भारतीय) चवीचे जेवण वाटते.माझे थाई पदार्थ शिकण्याचे प्रयत्न चालू असतात. तेव्हा मी शोधलेल्या वेबसाईट्सचे सर्च इंजिन बनवावे असे डोक्यात आले. साधारण ५० थाई साईट्स/ ब्लॉगचे हे सर्च इंजिन साहित्याप्रमाणे (Ingredients) रिझल्ट्स देते.
थाई पदार्थ हे नॉनवेजकरीता जास्त फेमस आहेत तरीही थाई पदार्थांमध्ये खुप विवीधता आहे. छान सूप्स आहेत, गोड पदार्थ आहेत. पपई, आंबा, केळी, नारळ वापरून बनवलेल्या भाज्या, गोड पदार्थ आणि वेगवेगळे फ्राईड राईस आहेत, अशी बरीच विवीधता आहे.
तुम्हाला थाई पदार्थांविषयी जाणून घ्यायचे असेल तर हि सर्च इंजिनची लिंक
थाई रेसिपी सर्च इंजिन
काही खास थाई शाकाहारी रेसिपीज
टोफू कोकोनट करी
ग्रिल्ड वेजिटेबल्स
थाई मुळा आणि काकडीचे सलाड
थाई मँगो अँड स्टिकी राईस
Monday, June 16, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment