![icecream dessert, sweet treat, noodles with icecream, noodles recipe, noodles dessert recipe, dessert recipe](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCBGmf1a8DIJxzUlGRCTl4Pli_m5OyMZuOUZUeeaTpzlLh_u9TbGVuqr1ypNxbv7fAwLREX-n-0WYvI_Tujs1ubmb-Yr0kcjQnfN22ZB9YTKrFrKo0BJy6rVfuuXs4sVAAE4pC_VFk41uw/s320/Copy+of+1+025.jpg)
साहित्य:
१/२ कप फ्लॅट नूडल्स
३-४ स्कूप वेनिला आईसक्रिम
२ टेस्पून बदाम, पिस्ता यांचे पातळ तुकडे
१ टिस्पून तिळ (ऑप्शनल)
तळण्यासाठी तेल
स्विट सॉससाठी:
२ टेस्पून मध
३ टिस्पून साखर
१/४ कप पाणी
कृती:
१) सर्वात आधी नूडल्स पाण्यात शिजवून घ्याव्यात. त्या आधी चाळणीत काढून त्यातील पाणी काढून घ्यावे. नूडल्स टिपकागदावर काढून ठेवाव्यात.
२) नूडल्स थंड झाल्यावर त्या तेलात गोल्डन ब्राऊन तळून घ्याव्यात.
३) नॉनस्टिक फ्राईंग पॅनमध्ये १/४ कप पाणी घ्यावे, त्यात ३ टिस्पून साखर घालून पाक करून घ्यावा गॅस बंद करावा, फ्राईंग पॅनमधून पाक दुसर्या भांड्यात काढून त्यात मध घालावे. घट्टसर सॉस बनवून घ्यावा.
४) फोटोत दाखवल्याप्रमाणे प्लेटमध्ये प्रथम नूडल्स पसरवावेत, त्यावर तयार केलेला सॉस घालावा. लगेच त्यावर आईसक्रिमचे स्कूप घालावेत. सर्व्ह करताना वरती बदाम पिस्ताचे काप घालावेत.
Labels:
Dessert Recipe, Ice Cream, Noodles with Icecream, Cold Dessert Recipe, quick and easy dessert recipe
No comments:
Post a Comment