Tuesday, April 1, 2008

कॉर्न अँड पाइनॅपल सलाड - Corn Pineapple Salad

Corn & Pineapple Salad (English Version)

Colorful and Delicious

मक्याचे हे सलाड चवीला छानच लागते ! आणि अननसाबरोबर याची चव तर अधिकच वाढते. तसेच करायलाही अगदी सोपे आहे. नक्की करून बघा हे सलाड आणि कळवा कसे झाले होते ते !!

corn salad, pineapple salad, salad recipes, healthy heart recipe, corn, pineapple, Fruit salad, salads, heart healthy recipes, easy recipe, easy salad recipes
वाढणी: साधारण दिड कप

साहित्य:
१ कप स्विट कॉर्न
१/४ कप हिरवी भोपळी मिरची, कॉर्न एवढ्या आकारात चौकोनी चिरलेली
१/४ कप लाल भोपळी मिरची, कॉर्न एवढ्या आकारात चौकोनी चिरलेली
२ अननसाचे काप, चौकोनी चिरलेले
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा लिंबाचा रस
२ चमचे अननसाचा रस
सजावटीसाठी कोथिंबीर
चवीपुरते मिठ
चवीपुरती मिरपूड

कृती:
१) पटकन सलाड बनवण्यासाठी कॅनमधील स्विट कॉर्न वापरावा. वापरण्यापुर्वी कॉर्न एकदा पाण्याखाली धुवून घ्यावे. जर कणीस आणून त्याचे दाणे वापरणार असाल तर पाण्यात थोडे मिठ घालून दाणे शिजवून घ्यावेत. नंतर त्यातील पाणी काढून थंड होवू द्यावेत.
२) हिरवी आणि लाल भोपळी मिरची कॉर्नच्याच साईजची चिरून घ्यावी.
३) अननसाचे १ इंचाचे तुकडे कापून घ्यावे.
४) हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घ्यावी.
५) चिरलेली भोपळी मिरची, अननस, कॉर्न एकत्र करावे त्यात लिंबाचा रस , अननसाचा रस, मिठ, मिरची घालून निट मिक्स करावे.
६) सर्व्ह करायच्या आधी फ़्रेश मिरपूड वरती भुरभुरावी. आणि कोथिंबीरीने सजवावे.

Labels:
Corn Salad, Pineapple Salad, Corn, Pineapple, Salad Recipe, Corn recipes,Heart Healthy Recipe, Diet Food, Diet Recipe, easy recipe, easy salad recipe, Low fat recipe, fat free diet recipe, fat free diet recipe

No comments:

Post a Comment