Spring Roll (English Version)
वाढणी : १२ स्प्रिंग रोल
साहित्य:
कव्हरसाठी:
१/२ कप मैदा
१/२ कप तांदूळ पिठ
१/२ कप कॉंर्न स्टार्च
चवीपुरते मीठ
३ चमचे तेल
सारणासाठी:
१ कप बारीक उभी चिरलेली कोबी
१/२ कप बारीक उभी चिरलेली भोपळी मिरची
२ गाजर किसून
२-३ चमचे पातळ गोल चिरलेली फरसबी
१/२ कप बारीक उभा चिरलेला कांदा
२ पाती कांदा बारीक चिरून
(पाती १ इंच बारीक उभ्या चिराव्यात)
१ ते दिड चमचा सोया सॉस
१/४ चमचे मिरपूड
चवीनुसार मीठ
१/२ चमचे तेल
स्प्रिंग रोल डिपींग सॉसची कृती
कृती:
१) तांदूळपिठ, मैदा, कॉंर्न स्टार्च एकत्र करून त्यात ३-४ चमचे तेल कडकडीत तापवून मोहन घालावे. चवीपुरते मिठ घालावे. पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. सारण तयार होईस्तोवर झाकून ठेवावे.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनला १/२ चमचा तेल लावून घ्यावे. मोठ्या आचेवर कांदा अगदी २०-२५ सेकंद परतून घ्यावा. कांदा बाजूला काढावा.
३) भोपळी मिरची, कोबी एकत्र करून अर्धकच्च्या परतून घ्याव्यात. परतताना मिठ, सोया सॉस आणि मिरपूड घालावी. भोपळी मिरची व कोबी बाजूला काढून फरसबी, गाजर अर्ध कच्चे परतून घ्यावे. पाती कांदा १०-१५ सेकंद परतून घ्यावा. या सर्व परतलेल्या भाज्या एकत्र मिक्स कराव्यात.
४) भिजवलेल्या पिठाचे लहान गोळे करून पातळसर पोळी लाटून घ्यावी. शक्यतो चौकोनी आकारात लाटावी. जर तसे न जमल्यास मोठा गोल लाटून सुरीने कडा कापून चौकोनी करावा.
५) फोटो क्र. २ मध्ये दाखवल्याप्रमाणे १-२ चमचे तयार केलेली भाजी आवरणावर ठेवावी.
६) फोटो क्र. ३-४ मध्ये दाखवल्याप्रमाणे मुडपावे आणि पुढे गुंडाळून रोल करावा.
पाण्याचे बोट लावून शेवटचे टोक चिकटवावे. आणि मध्यम आचेवर तेलात तळून काढावे. मोठ्या आचेवर तळले तर कव्हर आतल्या बाजूने कच्चे राहू शकते.
Labels:
Spring Roll, Spring Roll recipe, vegetable spring roll, Chinese spring roll, recipe for vegetable spring roll, spring roll wrappers, spring rolls recipe
Friday, April 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment