Tikhat Shira in English
वेळ: ३० मिनीटे
वाढणी: २ ते ३
साहित्य:
१ वाटी रवा
अडीच ते तीन वाटी पाणी
१ कांदा
२-३ मिरच्या
४ कढीपत्त्याची पाने
फोडणीसाठी : ३-४ चमचे तेल, मोहोरी, हिंग, हळद
चवीपुरते मीठ
१/२ चमचा साखर
लिंबाचा रस
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर, खोवलेला नारळ
थोडी शेव (ऑप्शनल)
कृती:
१) रवा चांगला भाजून घ्यावा. एका कढईत ३-४ चमचे तेल तापवावे. मोहोरी, हिंग, हळद कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात चिरलेला कांदा घालावा. १ लहान चमचा मिठ घालावे. कांदा शिजू द्यावा.
२) कांदा निट शिजला कि त्यात रवा घालावा. दुसर्या गॅसवर पाणी तापत ठेवावे. रवा थोडावेळ कांद्याबरोबर परतावा. पाणी उकळले कि भाजलेल्या रव्यात ओतावे. निट मिक्स करावे त्यात साखर आणि आवश्यकतेनुसार मीठ घालावे. वाफ काढावी.
३) सर्व्ह करताना शेव, खोवलेला नारळ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावे.
टीप:
१) रवा निट भाजला आणि मऊसर सांजा हवा असेल, तर ३ वाट्या पाणी सहज लागते. पण जर थोडा फडफडीत सांजा पाहिजे असेल तर त्यात अडीच वाट्या पाणी घालावे.
२) आवडीनुसार सांज्यात काजू, बारीक चिरलेला टोमॅटो, मटार घालू शकतो.
Labels:
breakfast recipe, maharashtrian breakfast recipe, sanja recipe, vegetarian recipe, Maharashtrian recipe, semolina recipe, Pivla sheera recipe, tikhat mithacha shira recipe, tikhamithacha sanja
Wednesday, April 16, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment