Sanjyachya Polya (English Verion)
साहित्य:
सारणासाठी:
२/३ कप बारीक रवा (१ भाग रवा)
३-४ चमचे तूप
दिड कप किसलेला गूळ (२ भाग किसलेला गूळ)
पावणेदोन कप पाणी (अडीच भाग पाणी)
२/३ कप दूध (१ भाग दूध)
वेलची पूड
पोळीसाठी:
२/३ कप मैदा
१/४ कप कणिक
४ चमचे तेल
कृती:
१) सर्वात आधी सारण करून घ्यावे.
२/३ कप रवा मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावा. रवा भाजताना दुसर्या गॅसवर पाउणेदोन कप पाणी गरम करावे. रवा निट भाजला गेला कि गरम पाणी घालून ढवळावे आणि वाफ काढावी. पाणी आळत आले कि लगेच गूळ घालावा. गूळ वितळला कि त्यात गरम दूध घालाव, वेलचीपूड घालावी व मध्यम आचेवर वाफ काढावी. रवा जर चांगल्याप्रकारे भाजला असेल तर रवा, दूध आणि पाणी दोन्ही व्यवस्थित शोषून घेतो. त्यामुळे रवा व्यवस्थित भाजला जाईल याची काळजी घ्यावी.
२) हे सारण गार होत आले कि हाताने मळून घ्यावे. आणि दोन ते अडीच इंच आकाराचे गोळे करावे.
३) मैदा व कणिक एकत्र करून घ्यावे. त्याला ३-४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. आणि मध्यमसर किंवा किंचीत पातळसर भिजवावे. (पुरणपोळीला पिठ भिजवतो त्यापेक्षा घट्ट असावे.)
४) भिजवलेल्या पिठाचे १ इंचाचे गोळे करावेत. याची बोटांनी २ इंचाची पारी करून घ्यायची (मोदकाला करतो तशी). त्याच्या मध्यावर तयार केलेल्या सांज्याचा एक गोळा ठेवावा. आणि पारीच्या सर्व बाजू बंद करून सारण आत भरावे. थोडे गव्हाचे पिठ लावून पोळ्या लाटाव्यात. आणि तव्यावर भाजाव्यात.
भाजताना थोडे तूप घातले तर छान खरपूस लागते.
Labels: Sanjyachya Polya, Sanjachya Polya, Sanjyachi poli, Sweet chapati, Semolina Chapati, Sweet Semolina Chapati
Wednesday, April 23, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment