Bread Roll (English Version)
वाढणी : ५ ते ६ ब्रेड रोल
साहित्य:
५-६ ब्रेडचे स्लाईस (व्हाईट)
१ कप उकडलेल्या बटाटा फोडी
१/४ कप मटार
१/४ कप कांदा, बारीक चिरून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१/२ टिस्पून किसलेले आले
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१ टिस्पून गरम मसाला
१/२ टिस्पून आमचुर पावडर
फोडणीसाठी : २ टिस्पून तेल, १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
कढीपत्ता
चवीनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
कृती:
१) बटाटा उकडून, सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. मटार वाफवून घ्यावेत.
२) कढईत तेल गरम करून जिरे, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. फोडणीत कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि आले घालावे. काही सेकंद परतून कोथिंबीर घालावी, कांदा घालावा. थोडे मिठ घालून कांदा शिजेस्तोवर परतावे.
३) नंतर मटार आणि बटाटा घालून परतावे. गरम मसाला, आमचुर पावडर घालून निट मिक्स करावे. मध्यम आचेवर एक वाफ काढावी. गरजेनुसार मिठ व तिखट वाढवावे. भाजी थोडी गार होवू द्यावी.
४) ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात. ब्रेड हातात घेऊन त्यावर थोडे पाणी शिंपडावे आणि ब्रेड ओलसर करावा. अधिकचे पाणी ब्रेड दोन्ही हातांमध्ये चेपून काढून टाकावे. ब्रेड काळजीपूर्वक हाताळावा.
५) या ओलसर ब्रेड स्लाईसच्या मध्यभागी एक ते दिड चमचा भाजी ठेवावी व चित्रात दाखविल्याप्रमाणे फोल्ड करून रोल बनवावा. रोल एकदम छान बांधला गेला पाहिजे. आवरणाच्या फटी राहिल्या तर तेल आत जाईल आणि खाताना रोल तेलकट लागेल.
६) तयार रोल तेलात सोनेरी रंगावर तळून काढावेत.
टोमॅटो सॉसबरोबर गरम गरम सर्व्ह करावेत.
टीप:
१) स्टफिंग आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या कॉंम्बिनेशनमध्ये बनवू शकतो.
Labels:
bread roll, veg bread roll, easy bread roll recipe, stuffed bread rolls
Thursday, August 14, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment