Thursday, August 21, 2008

शेजवान सॉस - Schezwan Sauce

Schezwan Sauce in English

वाढणी : साधारण अर्धा कप

हा शेजवान सॉस चायनिज स्टर फ्राईड वेजिटेबल्स बरोबर सर्व्ह करावा तसेच इतर चायनिज पदार्थातही याचा वापर करता येतो.

chinese food, oriental market, chinese cuisine, chinese restaurant,asian, indo china
साहित्य:
१ टिस्पून लसूण पेस्ट
२ टिस्पून चिरलेले लसूण
२ टेस्पून पाती कांदा
१ टेस्पून पाती कांद्याची पाती
१ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टेस्पून चुरडलेल्या लाल मिरच्या
दिड टेस्पून लाल तिखट
१/३ कप टोमॅटो प्युरी
१ टेस्पून सोया सॉस
दिड टेस्पून व्हिनेगर
२ टेस्पून तेल
१ टिस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ टिस्पून साखर
१/४ टिस्पून मिरपूड
चवीनुसार मिठ

शेजवान सॉस याही पद्धतीने करता येईल - Schezwan Sauce

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण फोडणीस घालावे, थोडा रंग बदलला पाती कांदा, कोथिंबीर आणि चुरडलेल्या लाल मिरचीची पूड घालून मिक्स करावे. १ ते २ मिनीटे परतावे.
२) नंतर लाल तिखट, टोमॅटो प्युरी, सोया सॉस, व्हिनेगर घालून निट मिक्स करावे. साखर, मिरपूड आणि मिठ घालावे. सर्व एकत्र ढवळून घ्यावे.
३) १ टिस्पून कॉर्न फ्लोअरमध्ये २ टेस्पून पाणी घालावे आणि मिक्स करावे. हे मिश्रण सॉसमध्ये घालावे व ढवळून मध्यम आचेवर १-२ मिनीटे उकळू द्यावे.
सॉस दाटसर झाला कि गॅसवरून उतरवावा. वरून चिरलेल्या पाती घालून मिक्स करावे.

टीप:
१) हा सॉस खुप तिखट असतो त्यामुळे वापरताना गरजेपुरताच वापरावा किंवा लाल तिखटाचे प्रमाण कमी करावे.
२) उरलेला शेजवान सॉस लहान डब्यात भरून फ्रिजमध्ये ६-७ दिवस सहज टिकतो.

Labels:
Schezwan Sauce, szechwan, Sichuan sauce, Chinese Food

No comments:

Post a Comment