Friday, August 1, 2008

शेंगदाण्याची उसळ - Shengadanyachi Usal

Peanuts Curry (English Version)

वाढणी : २ जणांसाठी
हि शेंगदाणा उसळ उपवासाच्या फराळी मिसळीमध्ये उत्तम लागते. फराळी मिसळीच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा.

peanut curry, peanut sauce, Indian Peanuts curry, Curry recipe, vegetarian recipeसाहित्य:
३/४ कप शेंगदाणे
१ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१/२ कप पाणी
२ आमसुलं
२-३ हिरव्या मिरच्या
१ टिस्पून गूळ
चवीपुरते मिठ

कृती:
१) शेंगदाणे ५-६ तास भिजवून ठेवावे. नंतर प्रेशर कूकरमध्ये शिजवून घ्यावे. शिजवलेल्या शेंगदाण्याची उसळ करून घ्यावी.
२) उसळीसाठी आधी ४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट आणि १/२ कप पाणी एकत्र मिक्सरमध्ये फिरवावे, यामुळे हे मिश्रण दाटसर होईल आणि उसळीला थोडा दाटपणा येईल.
३) नंतर पातेल्यात तूप गरम करून त्यात जिरे मिरचीची फोडणी करावी. त्यात कूटाचे मिश्रण घालावे. आवडीप्रमाणे थोडे पाणी वाढवून पातळ करून घ्यावे. यात आमसुलं, मिठ आणि गूळ घालून एक उकळी येऊ द्यावी. नंतर शिजलेले शेंगदाणे घालून मध्यम आचेवर उकळी काढावी. या उसळीला थोडा रस ठेवावा.

टीप:
१) जर तुम्ही नुसती उसळ खाणार असाल तर फोडणीमध्ये उकडलेला बटाटा किंव रताळे घातल्यास अधिक चविष्ट लागेल.

Labels:
peanut curry, shengdana usal, upavas usal

No comments:

Post a Comment