Friday, October 24, 2008

गुलकंद बर्फी Gulkand Barfi

Gulkand Burfi in English

वाढणी: साधारण १० ते १२ वड्या

diwali sweets, indian sweets, mithai, rasmalai, Milk Sweetsसाहित्य:
सव्वा कप खवा ( रिकोटा चिजपासून खवा)
१/४ ते १/२ कप साखर
३ टेस्पून गुलकंद
१ टिस्पून तूप

Diwali, Faral, Sweets, quick recipe, Mithai Box, Indian Food, Healthy foodMithai, Pedha, barfi, sweets, Indian Diwali Festival Food








कृती:

१) रिकोटा चिजपासून खवा बनवण्याची कृती
२) १/२ टिस्पून तूप नॉनस्टिक पॅनमध्ये गरम करावे. त्यात खवा मध्यम आचेवर भाजून घ्यावा. साधारण ६-७ मिनीटे. नंतर त्यात साधारण १/४ ते १/२ कप साखर घालून मिक्स करावे. साखर अंदाज घेतघेत घालावी कारण गुलकंदातही साखर असते. अशावेळी चमचा साखर घालावी आणि चव घेवून पाहावे. मंद आचेवर मिश्रण दाटसर होवू द्यावे.
३) खवा घट्टसर झाला कि गॅस बंद करावा. अंदाजे १/३ मिश्रण काढून घ्यावे. पोळपाटाला किंवा एका ताटाला तूपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण चौकोनी आकारात साधारण १ सेमी उंचीचे थापावे. वार्‍यावर थंड होवू द्यावे.
४) उरलेल्या २/३ खव्यात २-३ टेस्पून गुलकंद घालून निट मिक्स करावे. मंद आचेवर २-३ मिनीटे परतावे. या मिश्रणाचा गोळा हाताळण्यायोग्य झाला कि चौकोनी आकारात थापलेल्या खव्याच्या वर त्याच आकारात गुलकंदयुक्त खवा थापावा.
थंड झाले कि वड्या पाडाव्यात.

टीप:
१) मी वापरलेले गुलकंद वेलचीयुक्त होते म्हणून मी खवा परतताना वेलची घातली नव्हती. जर गरज वाटल्यास वेलची घालावी.
२) वड्या थापताना खुप तूप वापरू नये नाहीतर वड्या खुप तूपकट होतात.
३) मिश्रण थापताना हाताला खुप गरम लागत असेल तर जाडसर प्लास्टिकच्या तुकड्याला थोडे तूप लावून मिश्रण थापण्यासाठी वापरावा.

Labels:
Gulkand Barfi, Burfi mithai recipe, sweets Indian, Diwali Sweets

No comments:

Post a Comment