Thursday, October 30, 2008

पनीर - Paneer

Paneer in English

Indian Cheese, Homemade Paneer, Paneer kase banvave, how to make Paneer Cheese at home
साहित्य:
१/२ गॅलन दूध (होल मिल्क)
२ टेस्पून व्हिनेगर किंवा लिंबाचा रस
१ सुती कपडा किंवा मस्लिन क्लॉथ
१ चाळणी किंवा कोलँडर

कृती:
१) एक जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात दूध ओतून मध्यम आचेवर दूध उकळवायला ठेवावे.
२) दुध वाफाळले कि मोठ्या चमच्याने ढवळावे. दुध पातेल्याच्या तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. दुध वाफाळले कि आच मिडीयम लो वर ठेवून त्यात १ टेस्पून व्हिनेगर हळूहळू घालावे. एकाच वेळी सर्व व्हिनेगर घालू नये, थेंबथेंब करून सर्व ठिकाणी व्हिनेगर घालून ढवळत राहावे. दुध फाटण्याची क्रिया सुरू झाली कि गॅस एकदम मंद करावा आणि व्हिनेगर घालून ढवळत राहावे. हळूहळू चोथा आणि पाणी वेगळे होईल. गॅस बंद करावा. पाण्याचा पांढरट रंग गेला कि समजावे पनीर गाळण्यासाठी तयार आहे.
३) पाणी आणि पनीर वेगळे झाले कि सुती कपडा चाळणीत पसरवून ठेवावा आणि चाळणीच्या खाली पाणी जमवण्यासाठी पातेले ठेवावे. पनीरचे ग्रॅन्युल्स कपड्यातच ठेवून गार पाण्याखाली हलक्या हाताने धुवून घ्यावे, म्हणजे व्हिनेगरचा वास जाण्यास मदत होते.
४) पनीर साधारण १/२ तास टांगून ठेवावे. नंतर गच्च चौकोनी आकारात बांधून घ्यावे म्हणजे पनीरची घट्ट अशी वडी बनेल आणि छान क्युब्ज कापता येतील.
५) एखादा प्लेन सरफेस (पोळपाट, फळी, कटींग बोर्ड) तिरका ठेवावा व त्यावर बांधलेले पनीर ठेवावे आणि बांधलेल्या पनीरवर एखादी जड वस्तू ठेवावी (वरवंटा). जड काही नसेल तर कूकरमध्ये पाणी भरून झाकण लावावे आणि कूकर पडणार नाही अशा रितीने ठेवावे. पनीर तिरक्या पोझिशनमध्ये ठेवल्याने त्यातील अधिकचे पाणी निघून जाईल. जर काही लाकडी वस्तू प्लेन सरफेस म्हणून वापरणार असाल तर त्यावर प्लास्टिक किंवा अल्युमिनीयम फॉईल ठेवावी नाहीतर लाकूड तसेच पनीर खराब होवू शकते.
६) ६ ते ७ तासात पाणी निघून जाते आणि पनीरची छान वडी तयार होते.

टीप:
१) सुती कपडा एकदम घट्ट विणेचा असु नये नाहीतर गाळताना निट गाळले जात नाही, पाणी पुर्ण वाहून जात नाही.
२) लिंबाचा रस थोड्या पाण्यात मिसळून ते पाणी गरजेपुरतेच वापरावे. लिंबाचा रस जास्त घातला गेला तर पनीरला लिंबाचा स्वाद लागू शकतो.
३) गाळलेले पाणी बाटलीत भरून रेफ्रिजरेट करून नंतर पनीर बनवताना व्हिनेगरऐवजी वापरता येते.

Labels:
Paneer Recipe, how to make Indian Paneer Cheese, Homemade Paneer

No comments:

Post a Comment