Green Chili Pickle in English
वाढणी: खाली दिलेल्या प्रमाणानुसार १/२ ते पाऊण कप लोणचे बनेल.
या पाककृतीमध्ये हिरव्या मिरच्या फेसलेल्या मोहोरीमध्ये घातल्या जातात. मिरचीचे लोणचे / फोडणीच्या मिरचीची कृती इथे पाहायला मिळेल.
साहित्य:
१/२ कप मिरच्यांचे तुकडे
१/८ कप मिठ
१/२ टिस्पून हिंग
१/४ कप मोहोरी पावडर (लाल)
१/२ कप पाणी
१ टेस्पून लिंबाचा रस
फोडणीसाठी::
१/८ कप तेल
१/८ टिस्पून मोहोरी (Benefits of Mustard Seeds)
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
कृती:
१) मिरच्यांचे तुकडे एका वाडग्यात काढावेत. त्यात मिठ आणि हिंग घालून निट मिक्स करावे. १० ते १५ मिनीटे झाकून ठेवावे.
२) १/२ कप पाण्यात १/४ कप मोहोरी पावडर घालून १० मिनीटे भिजवून ठेवावी. लहान मिक्सरमध्ये हे मिश्रण घालून १ ते २ मिनीटे फिरवावी. हे मिश्रण चांगले फेसले गेले पाहिजे आणि पांढरट रंग आला पाहिजे.
३) हि फेसलेली मोहोरी पावडर मिरचीमध्ये घालावी. फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग आणि हळद घालून फोडणी तयार करावी. हि फोडणी एका वाटीत घालावी आणि थंड झाली कि मिरचीमध्ये घालावी. मिक्स करून त्यात लिंबाचा रस घालावा.
हि रसाची मिरची फार टिकाऊ नाही साधारण १५ एक दिवस बाहेर टिकते. शक्यतो फ्रिजमध्ये ठेवून द्यावे. सहज महिना दोन महिने टिकते.
Labels:
Rasachi Mirchi, Mirchiche Lonche, Green Chili Pickle, Mirachiche Lonache, Mirachi Lonache
Thursday, February 19, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment