वाढणी: २ ते ३ जणांसाठी
१ कप गाजराचा किस (३ मध्यम गाजरं)
१ मध्यम टोमॅटो
२ लहान हिरव्या मिरच्या
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून लिंबाचा रस
चिमूटभर हिंग
१/२ टिस्पून जिरे
१ टिस्पून तूप
१ टिस्पून साखर, किंवा चवीनुसार
चवीनुसार मिठ
कृती:
१) गाजराचा किस एका वाडग्यात घ्यावा. त्यात टोमॅटो बारीक चिरून घालावा. मिरच्या चिरून घ्याव्यात, थोडे मिठ घालून चुरडाव्यात आणि गाजराच्या किसात घालाव्यात. (टीप १)
२) यामध्ये शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस, कोथिंबीर, मिठ आणि साखर घालून हलक्या हाताने मिक्स करावे.
३) कढल्यात तूप गरम करून त्यात हिंग, जिर्याची फोडणी करावी. हि गरम फोडणी लगेच कोशिंबीरीत घालावी आणि छान मिक्स करावे.
जेवताना तोंडीलावणी म्हणून हि कोशिंबीर छान लागते.
टीप:
१) मिरच्या चुरडून घालायच्या नसतील तर तूपाची फोडणी करतो त्यात चिरलेल्या मिरच्या घालाव्यात म्हणजे सर्व कोशिंबीरीला मिरचीचा तिखटपणा लागतो.
२) डाएटमुळे तुपाची फोडणी टाळायची असेल फोडणी न घालता, जिर्याचा स्वाद लागावा म्हणून एक-दोन चिमटी जिरेपूड घालावी.
Labels:
Gajarachi Koshimbir, Gajar Koshimbir, Carrot Salad
No comments:
Post a Comment