Schezwan Potato in English
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
३ मध्यम बटाटे (Know more - Is Potato bad for health?)
२ टिस्पून तिळ
२ टेस्पून शेंगदाणे
१/२ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून विनेगर
१/४ टिस्पून सोयासॉस
१ टेस्पून शेजवान सॉस किंवा २ टेस्पून Ching's Secret Schezwan sauce (रेडीमेड)
४ टेस्पून तेल
१/२ टिस्पून लाल तिखट
२ लाल मिरच्या
मिठ चवीनुसार
१ टेस्पून कांद्याची हिरवी पात सजावटीसाठी
कृती:
१) बटाटे शिजवून सोलून घ्यावेत. प्रत्येक बटाट्याचे मोठे तुकडे करून घ्यावेत (प्रत्येकाचे ६ ते ८ तुकडे). नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करावे, त्यात बटाट्याचे तुकडे घालून परतावे. बटाटे चांगले ब्राऊन रंगावर शालो फ्राय करून घ्यावेत, करपू देवू नयेत. बटाटे शालो फ्राय करून झाले कि पेपर टॉवेलवर काढून ठेवावेत. गरम असतानाच यावर मिठ आणि लाल तिखट (टीप १) भुरभूरवावे आणि हलक्या हातांनी मिक्स करावे.
२) मध्य्म आचेवर उरलेल्या तेलात शेंगदाणे घालून तळून घ्यावेत. शेंगदाणे पेपर टॉवेलवर काढून ठेवावेत आणि त्याच तेलात जिरे आणि तिळ घालावेत. तिळ थोडे गुलाबी रंगाचे झाले कि लगेच लाल मिरच्या (टीप १) आणि फ्राय केलेले बटाटे घालावेत आणि मिक्स करावे. वरून शेजवान सॉस, सोयासॉस आणि विनेगर घालून मिक्स करावे. गॅस बंद करावा. सजावटीसाठी १ टेस्पून कांद्याची हिरवी पात बारीक चिरून घालावी.
टीप:
१) जर घरगुती शेजवान सॉस (दिलेल्या कृतीनुसार) वापरणार असाल तर लाल तिखट किंवा लाल मिरच्या वापरू नयेत कारण घरगुती सॉस व्यवस्थित तिखट असल्याने अजून तिखटपणा वाढवावा लागणार नाही.
शेजवान सॉस
Labels:
Schezwan Potato, Shezwan Sauce Potato
Thursday, February 26, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment