Farasbichi Bhaji in English
२ ते ३ जणांसाठी
वेळे: २५ मिनीटे
साहित्य:
पाव किलो कोवळी फरसबी, चकत्या चिरून
१ टेस्पून तेल
फोडणीसाठी: १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून तिखट
४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून ओला नारळ
१ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून गोडा मसाला
१ टिस्पून गूळ
२ आमसुलं
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी कोथिंबीर
कृती:
१) फरसबी बारीक चिरून घ्यावी. कूकरमध्ये २ शिट्ट्या करून फरसबी शिजवून घ्यावी. शिजवताना फरसबीत मिठ घालावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. ओला नारळ घालून परतावे. त्यात शिजवलेली फरसबी घालावी. १/२ कप पाणी घालावे. त्यात शेंगदाण्याचा कूट, गोडा मसाला, गूळ आणि आमसुलं घालून मध्यम आचेवर थोडावेळ वाफ काढावी.
कोथिंबीरीने सजवून पोळीबरोबर सर्व्ह करावी.
Labels:
Green beans stir fry, French beans, farasbichi bhaji
Tuesday, September 15, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment