Paneer Frankie in English
Paneer is a very versatile ingredient. It can be used in sweet as well as savoury dishes. Though paneer is more popular in main dishes like Paneer Masala, Palak Paneer, Paneer Kofta etc. , it can be used to make healthy and delicious snack like the recipe posted below. This is a filling, kid friendly and nutritious snack. For preparing this dish, fresh made Paneer from milk is highly recommended. The wraps will be very tasty if the Paneer is fresh. Sometimes, the ready made paneer contains all purpose flour to make it firm and more suitable for Tikka and Sabjis. Wraps, Soups and Salads taste well with soft fresh paneer.
६ ते ७ पनीर फ्रॅन्की
वेळ: ४५ मिनीटे
साहित्य:
दिड कप पनीर, छोटे तुकडे
१ मोठा टोमॅटो, बारीक चिरून
१/४ कप कांदा, पातळ उभे काप
१/४ कप भोपळी मिरची, बारीक चिरून
१ टेस्पून तेल
मॅरीनेशन
१/४ कप दही
१ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून आले-लसूण पेस्ट
१ टेस्पून तांदूळ पिठ
२ चिमूटभर कसूरी मेथी
१/२ टिस्पून गरम मसाला
१/२ टिस्पून चाट मसाला
चवीपुरते मिठ
रॅप्स
१ कप कणिक
१/४ कप दुध
चवीपुरते मिठ
१ टेस्पून बटर, वितळलेले
मिंट चटणी (ऐच्छिक)
कृती:
१) मॅरीनेशनखाली दिलेले सर्व साहित्य एका वाडग्यात मिक्स करावे. पनीरचे तुकडे घालून चमच्याने मिक्स करावे. पनीरच्या तुकड्यांना मॅरीनेशन निट लागले पाहिजे. मॅरीनेट केलेले पनीर दुसर्या वाडग्यात काढून उरलेल्या मॅरीनेशनमध्ये टोमॅटो घालून मिक्स करावे. पनीर २० मिनीटे झाकून ठेवावे.
२) कणिक, मिठ आणि दुध एकत्र करून कणिक मळून घ्यावी. झाकून २० मिनीटे बाजूला ठेवावे.
३) एका पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करून त्यात कांदा ३० सेकंद परतावा. भोपळी मिरची घालून ३० सेकंद परतावे आणि मॅरीनेट केलेले पनीर आणि टोमॅटो घालून परतावे. मिनीटभरच परतावे. खुप वेळ परतू नये नाहीतर पनीर वितळते. चव पाहून वाटल्यास मिठ. तिखट घालावे. तयार स्टफींग एका वाडग्यात काढून ठेवावे.
४) कणिक ८ ते १० समान गोळ्यांमध्ये विभागून घ्यावी. पोळी लाटून तव्यावर नेहमीप्रमाणे भाजून घ्यावी. फक्त भाजताना थोडे बटर लावावे. पोळ्या मऊ राहण्यासाठी डब्यात भरून ठेवाव्यात.
५) जेव्हा पनीर फ्रॅन्की सर्व्ह करायचे असतील तेव्हा पनीरचे मिश्रण मायक्रोवेवमध्ये थोडे गरम करून घ्यावे. जर रॅप्स थोडे स्पाईसी बनवायचे असतील तर पोळीला थोडी मिंट चटणी लावावी. गरम तव्यावर हि पोळी ठेवावी. मध्यभागी दिड टेस्पून पनीरचे मिश्रण ठेवावे. आणि दोन्ही बाजू पनीरच्या मिश्रणावर ठेवून सुरळी करावी. सावकाशपणे गरम करावे आणि गरमा गरम सर्व्ह करावे. हे रॅप्स नुसतेही छान लागतात पण वाटल्यास टोमॅटो केचप आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
Labels:
Paneer Frankie, Paneer wraps, Spicy Paneer Rolls
Friday, October 2, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment