Tuesday, November 24, 2009

पनीर टिक्का - Paneer Tikka

Paneer Tikka in English

Few more Paneer Recipes - Paneer Frankie | Paneer Paratha | Paneer Kadhai | Paneer Pizza | Palak Paneer | Paneer Kofta Curry

३ ते ४ जणांसाठी
वेळ: साधारण ३० मिनीटे

paneer tikaa masala, paneer recipes, north indian paneer, Punjabi Paneer Tikka masalaसाहित्य:
३ ते ४ स्क्यूअर्स (लाकडी किंवा लोखंडी)
३ ते ४ लहान रंगीत भोपळी मिरच्या (लाल, हिरवा, पिवळा, केशरी)
३ ते ४ छोटे कांदे
८ ते १० छोटे लाल टोमॅटो (चेरी टोमॅटो)
२०० ग्राम पनीर
तेलाचे ब्रशिंग
२ टेस्पून तेल
१/२ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून लाल तिखट
चिमूटभर मिठ
चिमूटभर कसूरी मेथी
पनीर मॅरीनेशनसाठी
५ टेस्पून घट्ट दही
१ टेस्पून कॉर्नस्टार्च
१/४ टिस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून आलेलसूण पेस्ट
१ टिस्पून धणेजिरेपूड
२ चिमूटभर कसूरी मेथी
चवीपुरते मिठ

Paneer tikka, vegetable paneer tikka masala, Punjabi restaurant style paneer tikka masalaकृती:
१) जर लाकडी स्क्यूअर्स वापरणार असाल तर १/२ तास गार पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे ओव्हनमध्ये बेक करताना जळणार नाहीत.
२) मॅरीनेशनसाठीचे सर्व साहित्य एकत्र करून त्यात पनीरचे दिड इंचाचे तुकडे करून १५ मिनीटे मॅरीनेट करून ठेवावे.
३) भोपळी मिरच्यांचे १ इंचाचे चौकोनी तुकडे करावे. कांदे जर किंचीत मोठे असतील तर त्यांची साले काढून अर्धे करून घ्यावेत.
४) भाज्या चिरून झाल्या कि स्क्युअरमध्ये प्रथम एक टोमॅटो ओवून घ्यावा. नंतर २-४ तुकडे भाज्या आणि १ तुकडा पनीर असे ओवून सर्वात शेवटी परत टोमॅटो ओवावा. असे सर्व स्क्युअर्स तयार करून घ्यावे. (वरील प्रमाणाला ३ ते ४ स्क्युअर्स लागतील.)
५) ओव्हन ब्रोईलवर २ ते ३ मिनीटे प्रिहीट करावे. तोवर भाज्यांना तेल+मसाला मिश्रणाचे ब्रशिंग करावे. २ टेस्पून तेल, १/२ टिस्पून धणेपूड, १/२ टिस्पून जिरेपूड, १/२ टिस्पून लाल तिखट, चिमूटभर मिठ, चिमूटभर कसूरी मेथी असे साहित्य एकत्र करून भाज्यांना अलगद हाताने किंवा पेस्ट्री ब्रशने लावावे.
६) तयार स्क्युअर्स ओव्हनसेफ प्लेटला तेल लावून त्यावर ठेवावे (मी बिडाचा तवा वापरला होता) आणि साधारण २ ते ४ मिनीटे बेक करावे. खुपवेळ ब्रोईल करू नये त्यामुळे पनीर वितळते. पनीर आणि भाज्या थोड्या ब्राऊन झाल्या कि ओव्हन बंद करून लगेच बाहेर काढाव्यात.
६) स्क्युअर्स वरील भाज्या आणि पनीर हलक्या हाताने प्लेटमध्ये काढाव्यात आणि त्यावर गरमागरम टीक्का मसाला घालून सर्व्ह करावे.

टीप:
१) पनीर बेक करण्यासाठी त्याला थोडा घट्टपणा आणावा लागतो. म्हणून पनीर घरी बनवताना त्यात थोडा मैदा घालावा. पनीर बनवले कि आधी पनीर गाळून घेतल्यावर फडक्यातच पिळावे म्हणजे अधिकचे पाणी निघून जाईल. पनीर एका ताटलीत काढावे. या पनीरच्या चुर्‍यात २ ते ३ चमचे मैदा घालून थोडे मळावे. खुप मळू नये, आपल्याला फक्त मैदा सर्व पनीरला लावायचा आहे. मळल्यावर परत फडक्यात गच्च बांधून, वरती जड वस्तू ठेवून पनीरची वडी बनण्यासाठी सेट करावे.
२) पनीरचे तुकडे खुपवेळ मॅरीनेट करू नयेत. मऊ पडतात आणि बेक केल्यावर वितळतात.
३) जर ओव्हन नसेल तर मॅरीनेट पनीर तळून घ्यावे किंवा शालो फ्राय करावे आणि भाज्यांना तेल लावून कढईत मोठ्या आचेवर २ मिनीटे परतावे. पण बेक करून किंवा तंदूरमध्ये भाजून चव खुप छान येते.
४) पनीरचे तुकडे जरा मोठेच ठेवावे कारण लहान तुकडे स्क्युअरमध्ये ओवताना तुटतात.

Labels:
Paneer Tikka Masala, Punjabi Paneer Tikka recipe, Tikka Paneer recipe

No comments:

Post a Comment