Sunday, January 10, 2010

मेजरींग कप - Information about Measuring Cups

चकली ब्लॉगवर बर्‍याचशा पाककृतींमध्ये ’कप’ प्रमाणात मेजरींग आहे. हे कप म्हणजेच मेजरींग कप्स, त्याबद्दल माहिती पुढे दिलेली आहे.मेजरींग कप किचनमध्ये गरजेची वस्तू आहे. पदार्थ बनविताना जिन्नस जर मापात घेतले तर तोच पदार्थ परत बनविताना तशीच चव किंवा थोड्याफार फरकाने चाखता येते.

ड्राय मेजरींग कप (Dry Measuring Cup):


या मेजरींग कप्सचा सेट मिळतो. यामध्ये ४ ते ५ कप वेगवेगळ्या मापात मिळतात. शक्यतो १/४ कप, १/२ कप, २/३ कप आणि १ कप अशा मापात हे कप्स अव्हेलेबल असतात. प्लास्टिक, स्टील किंवा सिलिकॉन मटेरीयलमध्ये हे कप्स मिळतात. सहसा प्लास्टिकचे कप स्वस्त असतात.
हे कप आपण कोरडे पदार्थ (पिठ, साखर) मोजण्यासाठी वापरू शकतो. उदा. तुम्ही जर १ कप पिठ मोजत असाल तर पिठात १ कपचे प्रमाण बुडवून व्यवस्थित भरावा, आत पोकळी राहू देवू नये. कपाच्या कडेच्या वर जे जास्त पिठ भरले गेले असेल ते आडवी सुरी फिरवून सपाट माप भरावे.

मेजरींग स्पून (Measuring Spoon):


मेजरींग स्पून्सचा ४ पिसचा सेट येतो. यामध्ये १/४ टिस्पून, १/२ टिस्पून, १ टिस्पून आणि १ टेबलस्पून अशा ४ मापात मेजरींग स्पून मिळतात. या चमच्यातून लिक्विड, ड्राय तसेच सेमी लिक्विड पदार्थही मोजू शकतो.

लिक्विड मेजरींग कप (Liquid Measuring cup):


हा मेजरींग कप तुम्ही निवडाल त्या मापात मिळतात. हा कप शक्यतो काच किंवा प्लास्टिक मटेरीयलमध्ये मिळतो तसेच पारदर्शक असतो. एका बाजूला मिलीलिटर मध्ये मार्कींग असते तर दुसर्‍या बाजूला कपमध्ये प्रमाण दिलेले असते. लिक्विड मेजरींग कपचे मोठे माप शक्यतो ४ कप द्रव पदार्थ राहिल इतपत असते.

ड्राय मेजरींग कप वापरून द्रव (liquid) पदार्थही यातून मोजता येतात. मी ड्राय मेजरींग कप मधूनच द्रव पदार्थ मोजते.

जर तुमच्याकडे फ़क्त ड्राय मेजरींग कप्स आणि मेजरींग स्पून्स असतील, तरीही chakali blog वरील पदार्थ बनवायला व्यवस्थित माप घेता येते.

No comments:

Post a Comment