Tuesday, January 26, 2010

भेंडीची भाजी - Bhendichi Bhaji

Bhendi stir Fry in English

३ जणांसाठी
वेळ: साधारण ३५ मिनीटे (५ ते ८ मिनीटे भाजी चिरण्यास आणि साधारण २० ते २२ मिनीटे भाजी परतण्यास)

bhindi stir fry, lady finger curry, lady finger sabzi, bhendichi bhaji, bhendichya kachryaसाहित्य:
१/२ किलो कोवळी भेंडी
२ ते ३ टेस्पून तेल
फोडणीचे साहित्य: १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, २ कढीपत्ता पाने
२ ते ३ आमसुलं (टीप ३)
२ ते ३ टेस्पून ताजा खोवलेला नारळ (टीप ४)
चवीपुरते मिठ
चिमूटभर साखर

कृती:
१) भेंडी स्वच्छ धुवून घ्यावी आणि सुती कपड्याने पुसून कोरडी करून घ्यावी. प्रत्येक भेंडीचे डेख कापून पातळ (१ सेमी) चकत्या कराव्यात. किंवा आवडीनुसार तिरपे काप, उभे चार भाग करून भेंडी चिरू शकतो.
२) कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. चिरलेली भेंडी फोडणीस घालावी. आच मध्यम करून फोडणी भेंडीला सर्वत्र लागेल अशी परतावी.
३) मंद आचेवरच भेंडी परतावी. १ ते २ मिनीटांत भेंडीला तार सुटेल तेव्हा लगेच आमसुलं घालावीत. आणि परतावे.
४) भेंडीच्या भाजीत शक्यतो आधीच मिठ घालू नये कारण भेंडी परतल्यावर बरीच आळते आणि भाजी खारट होवू शकते. मिठ घातल्यास १ ते २ चिमटीच घालावे.
५) भेंडी मंद आचेवर झाकण न ठेवता परतत राहावी. चवीपुरते मिठ घालावे, किंचीत साखर घालावी.
भाजी शिजल्यावर त्यात ओला नारळ घालून २ मिनीटे परतावे.
तयार भाजी गरमागरम पोळीबरोबर सर्व्ह करावी.

भेंडीच्या इतर पाककृती:
चिंचगूळातील भेंडीची रस भाजी
क्रिस्पी भेंडी (भेंडीची कुरकूरीत भजी)
भरली भेंडी

टीप:
१) लाल तिखटाऐवजी १-२ हिरव्या मिरच्या चिरून घातल्या तरी चालते. फक्त सर्व्ह करताना मिरच्या काढून टाकाव्यात म्हणजे खाताना दाताखाली येणार नाहीत.
२) फोडणीत १ लहान कांदा बारीक चिरून घातल्यास चव छान येते.
३) जर आमसुल नसेल तर १ चमचा लिंबूरस किंवा २-३ चिमटी आमचूर पावडर घालावी. आंबटपणामुळे भेंडीला जी तार येत असते ती निघून जाते.
४) ताजा खोवलेला नारळ नसेल तर २ चमचे सुके खोबरे फोडणी घालावे.
५) भाजी परतताना वर झाकण ठेवल्यास भाजी थोडी बुळबूळीत आणि पाणचट होते व भाजीची चव उतरते.

Labels:
Bhendichi bhajji, paratleli bhendi, bhendi kachrya, bhindi stir fry, okra stir fry, lady finger curry.

No comments:

Post a Comment