२ जणांसाठी (२ पिझ्झा प्रत्येकी)
वेळ: २० मिनीटे
४ ब्रेडचे स्लाईस (टीप १) (I used 'Arnold - whole wheat sandwich thins')
१/२ कप पिझ्झा सॉस (कृतीसाठी इथे क्लिक करा)
१/२ कप भोपळी मिरचीचे पातळ काप
१/२ कप कांद्याचे पातळ काप
टोमॅटोच्या १२ पातळ चकत्या
१/२ कप किसलेले पनीर (ऐच्छिक)
अर्धा ते पाऊण कप किसलेले चिझ (मी ग्रेटेड पिझ्झा ब्लेंड वापरला होता)
ड्राय बेसिल किंवा ओरेगानोची पाने
२ ते ३ चिमटी मिठ
सुक्या लाल मिरच्यांचा चुरा आवडीनुसार
कृती:
१) ओव्हन ४०० F वर प्रिहीट करण्यास लावावे. चिरलेल्या सर्व भाज्यांवर थोडे मिठ पेरावे.
२) प्रत्येक ब्रेड स्लाईसवर पिझ्झा सॉस लावावा. त्यावर टोमॅटो, कांदा आणि भोपळी मिरची घालावी. वरून किसलेले पनीर पेरावे. ड्राय बेसिल पाने चुरडून भुरभुरावीत.
३) आवडीनुसार चिज घालावे. आणि साधारण १० मिनीटे बेक करावे किंवा चिज वितळून किंचीत सोनेरी झाले कि लगेच पिझ्झा बाहेर काढावा.
गरमागरम सर्व्ह करावा. सर्व्ह करताना वरून चिमूटभर ड्राय रेड चिली फ्लेक्स आणि ड्राय बेसिल पाने क्रश करून भुरभुरावीत.
टीप:
१) मी होल व्हिट सॅंडविच थिन्स वापरले होते. आवडीनुसार तसेच उपलब्धतेनुसार चौकोनी व्हाईट ब्रेड स्लाईस किंवा व्हिट ब्रेड स्लाईस वापरू शकतो. परंतु, साधे ब्रेडचे स्लाईस पिझ्झा सॉस घातल्यावर ओलसर होतात. तेव्हा पिझ्झा सॉस, भाज्या घातल्यावर जास्त वेळ न घालवता लगेच बेक करण्यास ओव्हनमध्ये ठेवावे.
२) भोपळी मिरची, कांदा, टोमॅटो बरोबर मश्रुम, ऑलिव, पालक घालू शकतो तसेच अननसाचे तुकडेही पिझ्झावर छान लागतात.
३) पिझ्झा सॉस घरी बनवू शकतो किंवा हल्ली वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये पिझ्झा सॉस मार्केटमध्ये विकत मिळतो, तो ही वापरला तरी चालतो.
No comments:
Post a Comment